Abdul Sattar On Sanjay Raut : काल ठाकरे गटाचे मुखपत्र सामना या वृत्तपत्रातून शिंदे गटांच्या आमदारांवरती अत्यंत खालच्या भाषेतून टीका केली गेली. या आमदारांचा उल्लेख कुत्रे म्हणून केला गेला. सामन्यातील या टीकेला उत्तर देताना आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अवस्था आता कुत्र्यापेक्षा वाईट झाली आहे. ते जर आम्हाला कुत्रा म्हणत असतील तर ते आमच्या मतावर राज्यसभेवर गेले आहेत. याचा अर्थ ते देखील कुत्रा आहेत. तो कुत्रा असतो म्हणून तो दुसऱ्याला कुत्रा म्हणतो. अशा शब्दात अब्दुल सत्तरानी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. रोज सकाळी उठतो आणि आमच्यावर कुत्रा सारखा भोकतो, त्याच्या पेक्षा देखील आम्हाला वाईट बोलता येते. पण आम्ही मर्यादा पळून आहोत असे देखील यावेळी सत्तार म्हणाले.
सध्या राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यातील विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तर सत्ताधारी देखील विरोधावर टीका करताना दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेते देखील एकमेकांवर टीका करत आहेत. या सर्वांच्या मध्यस्थानी आहेत ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. राऊत हे सत्ताधाऱ्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांवर देखील टीका करत आहेत.
Sharad Pawar मोठे नेते पण… वारसदार निर्माण करण्यात अपयशी, सामनातून परखड टीका
दिसेन दिवस राज्यात टीका करण्याची पातळी खालावत चालली आहे. अत्यंत खालच्या भाषेत राज्यकर्ते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण संजय राऊत हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर देखील टीका करत आहेत. तसेच महाविकास आघाडीतील नेते देखील संजय राऊत यांना त्यांच्या भाषेतून उत्तर देत आहेत.