Download App

‘औरंगजेबाप्रमाणे युतीचा मुद्दा उकरून दिशाभूल…,’ आदित्य ठाकरेंनी दिलं CM फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उत्तर

Aditya Thackeray Reply To CM Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेमध्ये बोलताना ठाकरेंसोबतची युती का तोडली? याची इनसाईड स्टोरी सांगितली होती. फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या याचा ठपका आदित्य ठाकरेंवर ठेवला होता. त्यावर आता आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) प्रतिक्रिया समोर आलीय.

आदित्य ठाकरेंचं उत्तर…

आदित्य ठाकरे (Shiv Sena) यांनी म्हटलंय की, युती तोडली आणि कशी तोडली हे सगळ्यांना माहीत आहे. जर तर मध्ये जाण्यात काहीही अर्थ नाही. युती कोणी तोडली, हे समोर आलं आहे. खडसेंनीही सांगितलं आहे. भाजप (BJP) आम्हाला मुख्यमंत्रीपद देणार, किती ते दिलदार होते. जर तर यात जाण्यात काही अर्थ नाही. औरंगजेबप्रमाणे युतीचा मुद्दा उकरून दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.

‘महाराष्ट्रात एक नेपाळी फिरतोय…तोच हिंदू धर्म वाचवू शकतो’ अनिल परबांचा हल्लाबोल, ठाकरे मिश्कीलपणे हसले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

शिवसेनेला तेव्हा 147 जागा देण्यासाठी आम्ही तयार होतो. शिवसेनाचा मुख्यमंत्री होईल आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल, असं ठरलं होतं. परंतु उद्धव ठाकरे मात्र 151 जागांवर ठाम राहिले अन् युती तुटली. त्यावेळी युवराजांनी घोषणा केली की 151 जागा लढणार, त्यामध्ये एकही जागा कमी होणार नाही. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. परंतु विधात्याच्या मनात मलाच मुख्यमंत्री बनवायचं होतं, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

‘करेंगे दंगे चारों ओर पुलिस…,’ कुणाल कामराचं नवं गाणं, स्टुडिओतील राड्यावरून शिवसेनेवर साधला निशाणा

तर आदित्य ठाकरे यावर बोलताना म्हणाले, हे विषय होत राहतील. मात्र, शेतकरी किंवा इतर विषय होतं नाही. कालच्या बैठकीबाबत अध्यक्षांचे आभार. नगरविकास मंत्री येऊन थातूरमातूर उत्तर देऊन गेले. पैशांची उधळपट्टी ही लाडक्या कंत्राटदारांवर होतेय. जे संविधान तोडून गद्दारी केली. ज्यांना संविधान मान्य नाही, ते संविधान संपवायला निघालेत. संविधान मानत असतील तर विरोधीपक्ष नेता उद्यापर्यंत जाहिर करतील, असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

नागपूरमध्ये जसं तोडफोड केलेल्यांकडून नुकसान भरपाई घेतली, तशीच भरपाई खारमध्येही घ्यावी, अशी मागणी देखील आदित्य ठाकरेंनी केलीय. नाहीतर चुकीची माहिती जाईल. प्रशांत कोरटकर याला मदत करणाऱ्याची चौकशी व्हायला हवी. कोरटकर, कोश्यारी यांसारखे महापुरूषांवर बोलल्यानंतर भाजप काही करत नाही, असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

 

follow us