Download App

विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्यच, त्यांना देखील जावे लागेल, आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांना सुनावले

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्याचे विधानसभा अध्यक्षचं संविधानाविरुध्द पदावर बसले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळे झाल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप आहे. या घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आमदारांसह राज्यपालांची भेट घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की सध्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आम्ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज केले आहे. ते संविधनाविरुध्द पदावर बसले आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, संविधनावर विश्वास आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे अपात्र झाल्यास काय होणार? जाणून घ्या शक्यता

मुख्यमंत्री कधी शेतात पळून जातात तर कधी गुवाहाटी कुठे निघून जातात. कॉन्ट्रॅक्टरला ६६ टक्के फायदा पोहोचवला जातो आहे. या आरोपासह पुरावा राज्यपालांकडे निवेदनासह दिलाय. या भ्रष्टाचाराची लोकायुक्त मार्फत चौकशी व्हावी. मुंबई महापालिका आयुक्तांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीय.

घटनाबाह्य सरकार आल्यानंतर जानेवारी महिन्यांपासून मुंबईतील रस्त्यांच्या कामाचे विविध घोटाळे उघडकीस आणले आहेत. त्याची माहिती राज्यपालांना दिलीय. याला मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक हे या सगळ्याला जबाबदार आहेत. बिल्डर कॉन्ट्रॅक्रटराच सरकारमध्ये बसले आहे. रस्त्यांचा मेगा टेंडर घोटाळा, खडी मक्तेदारी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला आहे. ६००० कोटींचा रस्ता घोटाळा झालाय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे राजीनामा देणार?; फडणवीस म्हणतात मूर्खांचा बाजार

१० रस्त्यांची काम देखील अद्याप सुरू झालेली नाहीत. गद्दार गॅंग सोडली तर सगळ्यांनी तक्रारी केल्या. मात्र कारवाई नाही झालेली आहे. खडी घोटाळ्यात मुख्यमंत्री यांचे जवळचे कंत्राटदार आणि माणसं यात सामील आहेत. रस्ते फर्निचर १६० कोटींची काम २६३ कोटी रुपयांना दिली आहेत. यांचा उद्देश मिंधे सरकार एका कॉन्ट्रॅक्टरला फायदा व्हावा हा एकमेव उद्देश आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

Tags

follow us