Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे अपात्र झाल्यास काय होणार? जाणून घ्या शक्यता

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे अपात्र झाल्यास काय होणार? जाणून घ्या शक्यता

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray :  ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी  एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे.  ते म्हणाले की, घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकालाचे संकेत चंद्रचूड यांनी दिले आहेत.

त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उद्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना अपत्रा ठरवार की त्यांच्या बाजून निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ता संघर्षाच्या या सर्व सुनावणीदरम्यान 16 आमदारांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मनाला जात आहे. त्यामुळे आता उद्या न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर,  दुसरीकडे राजकारण्यांची धाकधूक वाढली आहे.

अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं; SC च्या निर्णयाआधी नार्वेकरांचं पुन्हा महत्त्वाचं विधान

या आमदारांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या सहकाऱ्यांची नावे आहेत. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात लागला तर काय निर्णय लागू शकतो, यावर काही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

निकालानंतर शक्यता काय?

शक्यता क्रमांक 1 : सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तातडीने राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर नव्याने सरकार स्थापन करण्याचे सोपस्कार पार पाडावे लागतील.

शक्यता क्रमांक 2 : आमदारकी गेली तरी एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहिल का? हा प्रश्न आहे. काहींच्या मते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 6 महिन्यात पुन्हा आमदारपदी निवडून येतील. तर काहींच्या मते पुढील सहा वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे पहिल्या क्रमांकावर तर तानाजी सावंत दुसऱ्या स्थानी! ही आहे त्या १६ आमदारांची यादी…

शक्यता क्रमांक 3 : आमदारा अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांके सोपवला जाईल. तसं झाल्यास पुढील निवडणुकीपर्यंत सद्यस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल.

शक्यता क्रमांक 4 : सत्तासंघर्ष प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकजे सोपवलं जाईल.

शक्यता क्रमांक 5 : निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ठाकरे गट पुनर्विचार याचिका दाखल करुन पुन्हा कोर्टात दात मागू शकतं.

या आमदारांवर आहे अपात्रतेची टांगती तलावर

1.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – कोपरी-पांचपाखाडीचे आमदार,
2.आमदार तानाजी सावंत – भूम परंडा
3.आमदार अब्दुल सत्तार – सिल्लोड
4.आमदार यामिनी जाधव – भायखळा
5.आमदार संदीपान भुमरे – पैठण
6.आमदार भरत गोगावले – महाड
7.आमदार संजय शिरसाठ – छत्रपती संभाजीनगर पश्चिम
8.आमदार लता सोनावणे – चोपडा
9.आमदार प्रकाश सुर्वे- मागाठाणे
10.आमदार बालाजी किणीकर – अंबरनाथ
11.आमदार बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर
12.आमदार अनिल बाबर – खानापूर
13.आमदार संजय रायमूलकर – मेहेकर
14.आमदार रमेश बोरनारे – वैजापूर
15.आमदार चिमणराव पाटील – एरोंडोल
16.आमदार महेश शिंदे – कोरेगाव

follow us
  • fb
  • instagram
  • youtube