Download App

दिशाभूल करून प्रतिज्ञापत्र घेतले, अमोल कोल्हेंसह पाच आमदारांचा अजितदादांवर आरोप

  • Written By: Last Updated:

NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रे (NCP) पक्षाच्या पाच विद्यमान आमदार आणि एका खासदाराने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना शपथपत्रे सादर केल्याची माहिती आता समोर आली आहे. शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांचेही दोन्ही गटांकडे प्रतिज्ञापत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आपली दिशाभूल करून आपल्याकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे पाच आमदार व खासदार अमोल कोल्हे अधिकृतपणे कोणत्या गटाचे आहेत, याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.

‘खोट्या कुणबींना ओबीसीत घुसवलयं’; छगन भुजबळांचा थेट आरोप… 

अजित पवारांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर पक्षाचा लढा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता. त्यावेळी दोन्ही गटांकडून प्रतिज्ञापत्रेही सादर करण्यात आली. दोन्ही गटांच्या वतीने लाखो प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्र सादर केली, त्याच पद्धतीने आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांनीही प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यावेळी अमोल कोल्हेंनी अजित पवार गटाला आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. यावर आता खुद्द कोल्हेंनी भाष्य केलं. खासदार कोल्हे यांनी प्रतिज्ञापत्राबाबत आपली दिशाभूल केल्याचं म्हणत अजित पवार गटावर आरोप केला आहे.

प्रतापराव जाधवांच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला, नरेंद्र खेडेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब 

तर याच यासंदर्भात आमदार अशोक पवार यांनीही आपल्याला फसवून प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप केला. त्यामुळं आता अजित पवार गट याबात काय खुलासा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही बाजूंला प्रतिज्ञापत्रे देणारे राष्ट्रवादीचे पाच आमदार आणि एका खासदाराची नावे समोर आली आहेत. चेतन तुपे, किरण लहामटे, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक आणि अशोक पवार या आमदारांनी अजित पवार आणि शरद पवार गटाकडे आपली प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दिशाभूल करून प्रतिज्ञापत्र घेतले
आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांचे सुरूवातीला अजित पवार यांच्या गटाला प्रतिज्ञापत्र दिले होते. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. याबाबत काऊंटर प्रतिज्ञापत्र दाखल करून आमची दिशाभूल करून अजित पवार गटाने हे प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप अशोक पवार आणि अमोल कोल्हे यांनी केला आहे. हे प्रतिज्ञापत्रे शरद पवार यांच्या आदेशाने घेतले जात असल्याचे सुरुवातीला सांगितले. प्रत्यक्षात आमची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप या आमदारांनी केला.

शरद पवार गटाला नवं नावं
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्ह सुचवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार गटाने निवडणूक आयोगात तीन नावे सुचवली होती. या तीन नावांपैकी शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ हे नाव देण्यात आलं आहे.

 

 

 

follow us