Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगाचाही हात

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगाचाही हात

Jitendra Awhad : शिवसेनेतील फुटीनंतर एका वर्षानंतर आता राष्ट्रवादीतही (NCP) फुट पडली. अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेत. यावर अजूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेतील फुटीला भाजप जबाबदार असल्याचं बोलल्या गेलं. हेच राष्ट्रवादीच्या फुटीसंदर्भातही बोलल्या जातं आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला फोडण्याच्या कट कारस्थानात निवडणूक आयोगाचाही (election commission) हात असल्याचा गंभीर आरोप केला. (The Election Commission is also involved in the conspiracy to break the NCP)

आज जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, अजित पवार गटाचे लोक 30 तारखेला निवडणूक आयोगाकडे गेले आणि 5 तारखेला आयोग सांगत की, ते आमच्याकडे आले होते. हे निवडणूक आयोगाला याआधी का कळवता आलं नाही? म्हणजे, हा कटाचा, षडयंत्राचा भाग आहे. दुर्दैवाने यामध्ये निवडणूक आयोगही सामिल आहे, हे फसवाफसवीचे उद्योग आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला बॅकडेटेट करायला किती वेळ लागतो? असं आव्हाड म्हणाले.

स्टीव्ह स्मिथ सचिन आणि द्रविडच्या पुढे, 100 व्या कसोटीत रचणार इतिहास 

यावेळी त्यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकीय वृत्तीवरही प्रहार केला. ते म्हणाले, देशाच्या लोकशाही व्यवस्थेशी भाजप खेळत आहे. तुम्ही हेच प्रयोग कर्नाटकात, मध्य प्रदेशात, गोव्यात केले. पण, सगळीकडून लोकांचा उद्रेक दिसतो. आजही महाराष्ट्रात लोकोद्रेक दिसतो. लोकशाहीच्या व्याख्याच यांनी बदलवून टाकल्या….. फॉर द पिपल, बाय द पिपल, हे आता भाजपने ठेवलं नाही, अशा शब्दात भाजपचा समाचार घेतला. सत्ताकेंद्र हेच जर सर्वस्व असेल आणि ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायचं असेल तर हा देश तुटला म्हणून समजा, असंही आव्हाड यावेळी बोलले.

राष्ट्रवादीतील बडानंतर आज अजित पवारांनी पक्षाची बैठक घेतली. या बैठकीत बोलतांना अजित पवारांनी शरद पवारांसह जिंतेंद्र आव्हाडांवर टीका केली. या टीकेविषयी विचारले असता आव्हाडांनी एका वाक्यात उत्तर दिलं. नारळ कुणावर तरी फोडावं लागतं, म्हणून आमदार फुटले याचा दोष मला दिला जातो, असं आव्हाड म्हणाले.

आज अजित पवांरांनी आपल्या भाषणात शरद पवारांवर टिका करतांना निवृत्त का होत नाही, अशी बोचरी टीका केली होती. अजित पवारांच्या या टीकेचाही आव्हाडांनी समाचार घेतला. अजित पवारांना शरद पवार नकोसे होते. त्यासाठी सगळा आटापिटा होता. पण, तुम्हाला निवडून आणण्यासाठी हा माणूस कॅन्सर असतांनाही वणवण फिरला. पाय मोडलेला असतांना आणि रक्त-लाळ गळत असतांना रणरणत्या उन्हात तुमच्यासाठी फिरला. पार विदर्भही पालथा घातला. याच तुम्हाला काहीच वाटत नाही? असा सवाल करत मी शेवटपर्यंत पवार साहेबांसोबत आहे, असं ठणकावून सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube