Maharashtra Politics : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) आज भाजपात अधिकृतरित्या प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चव्हाणांचा हा निर्णय काँग्रेससह महाविकास आघाडीसाठी धक्का देणारा ठरला. शिवसेना आधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षांची जशी वाताहत झाली तशी काँग्रेसची झाली नव्हती. मात्र, आता काँग्रेसही फुटली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण. या फाटाफुटीने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष खिळखिळे झाले आहेत. अशा परिस्थितीतच महाविकास आघाडीला निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसने (Congress) डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत. या घडामोडींनंतर काँग्रेसमधील दिग्गज नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे मोठी जबाबदारी येणार आहे.
PM मोदींचे काम पाहून इम्प्रेस झालो : भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाणांची स्तुतीसुमने
मागील काही दिवसांत काँग्रेसला तीन मोठे धक्के बसले आहेत. आधी मिलिंद देवरा यांनी साथ शोडत शिंदे गटात प्रवेश केला. नंतर मुंबईतील बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. या अडचणींतून मार्ग काढून राज्यसभा निवडणुकांची तयारी आणि पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी थोरात यांच्यावर टाकली जाईल अशी शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सचिव केसी वेणुगोपाल यांनी थोरात यांना संपर्क साधला आहे.
अशोक चव्हाण यांच्या बरोबर आणखीही काही आमदार भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस नेते अलर्ट झाले आहेत. काँग्रेस सोडण्याची शक्यता आहे अशा आमदारांशी संपर्क साधला जात आहे. संघटना बांधणीकडे जास्त लक्ष देण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले, काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
‘मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार’ 50 वर्षांची सवय अन् अशोक चव्हाणांचं पोटातलं ओठावर
अशोक चव्हाण भाजपवासी
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. चव्हाणांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्येही हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्यानंतर आज (13 फेब्रुवारी) त्यांनी भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या कार्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.