Download App

आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या नीलम गोऱ्हेंची CM शिंदेंसाठी बॅटिंग

Maharashtra Assembly Session : आज पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. यावेळी सुरूवातील विधिमंडळाच्या विधानसभेत कामकाजला सुरूवात झाली. मात्र यावेळी झालेल्या गोंधळामुळे या सभागृहातील कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यानंतर आता विधिमंडळाच्या विधानपरिषद या सभागृहात कामकाज सुरू झाले आहे. ( After enter in Shinde Shivsena Neelam Gorhe supporting CM Shinde who Criticize Shinde while active in Thackery Group )

उद्घाटन फडणवीसांच्या दालनाचं मात्र, नारळ वाढवला एकनाथ शिंदेंनी

विधानपरिषदेत कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा परिचय करून दिला त्यानंतर विधानपरिषदेच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली हे कामकाज सुरू आहे. मात्र यावेळी इतके दिवस ठाकरे गटात असलेल्या नीलम गोऱ्हे आता शिंदेंच्या शिवसनेत गेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी शिंदेंची बाजु घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. तर ठाकरेंसोबत असताना त्यांनी अनेकदा शिंदेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मात्र या अधिवेशनामध्ये त्यांनी पहिल्यांदाच शिंदेंची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.

ना शिंदे ना फडणवीस, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांचा ‘स्वॅग’

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे ?

विधानपरिषदेत कामकाजा दरम्यान शेकापच्या जयंत पाटलाांनी गोऱ्हे यांच्या पक्ष सदस्यत्वावरून त्यांच्या सभापती असण्यावर आक्षेप घेतला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोऱ्हे यांच्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपाला उत्तर दिले. यावेळी विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यावर गोऱ्हे म्हणाल्या की, जयंत पाटलांना बोलू दिले फडणवीसांना देखील बोलू देण्यात यावे. असं म्हटल्या.

पुढे गोऱ्हे म्हणाल्या की, मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. तसेच सभागृहाच्या कामकाजात ज्या दिवशी शोक प्रस्ताव असतो त्या दिवशी अशा प्रकारे आक्षेप घेता येत नाही. तर माझ्या सभापतीपदावर आक्षेप घेणारे विरोधक जर गटनेत्यांच्या बैठकीला आले असता तर या विषयांवर बोलण्यासाठी माझ्याविरोधात जरी प्रस्ताव आहे. तरी वेळ निश्चित करण्यात आली असती. मात्र तुम्ही विरोधीपक्षनेते, शिवसेनेचे गटनेते गैरहजर राहिलात. त्यामुळे या विषयावर बोलण्यासाठी उद्याची वेळ निश्चित केली जाऊ शकते. असंही यावेळी गोऱ्हे म्हणाल्या. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे शिंदेंच्या बाजून आपलं मत मांडलं असल्याचं पाहायला मिळालं.

Tags

follow us