ना शिंदे ना फडणवीस, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांचा ‘स्वॅग’
Maharashtra Assembly Monsoon Session : आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी अजितदादांचाच स्वॅग पाहण्यास मिळाला. सध्या ट्विटरवर #AjitPawarForDevelopment असा हॅश टॅग ट्रेंडिंगमध्ये आहे.
विरोधी पक्षात असताना अजितदादांनी त्यांच्या स्टाईलने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलेले आपण सर्वांनीच पाहिले असून, वेळेचा पक्का माणूस अशी अजितदादांची ख्याती आहे. एवढेच काय तर कोणत्याही प्रश्नावर बैठक घेत त्यावर वेळीच मार्ग काढण्यात अजितदादांचा हातखंडा आहे. त्यामुळे ते नेहमी कौतुकास पात्र ठरतात. काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजितदादांनी घेतली. त्यानंतर खाते वाटपाचं घोंगडं भिजत पडलं होते. अर्थखात्यासह महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळावा यासाठी अजितदादा आग्रही होते. या खात्यांसाठी अजितदादांनी थेट दिल्ली गाठत शहांचीदेखील भेट घेतली. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसदेखील होते.
विधानसभेत ऐतिहासिक क्षण! विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची रिकामी तर माजी सहा चेहरे सत्ताधारी बाकावर
शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी खाते वाटप करण्यात आले आणि याचं वैशिष्ट म्हणजे ज्या महत्त्वाच्या खात्यांवर अजितदादा अडून होते ती सर्व खाती त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांना देण्यात आली. याचाच अर्थ अजितदादांच दबदबा राज्यासह थेट दिल्ली दरबारी असल्याची चर्चा या खाते वाटपानंतर सुरू झाली.
वंदे भारतमध्ये चर्चा फक्त अजितदादांची
नुकताच अजितदादांनी नाशिक येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, चर्चा झाली ती अजितदादांच्या वंदे भारत प्रवासाची. नाशिक येथील कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या लांब सडक ताफा रस्त्याने नेण्याऐवजी वंदे भारतने प्रवास केला. या प्रवासादरम्यान अजितदादा अगदी सर्व सामान्यांसारखे प्रवास करताना दिसले. एवढेच काय तर, आपण उपमुख्यमंत्री असल्याचा कोणताही अवीर्भाव चेहऱ्यावर किंवा देहबोलीतून न दाखवता प्रवासादरम्यान सोबतीच्या प्रवाशांसोबत चर्चा केली.
उपमुख्यमंत्री होताच बैठकींचं सत्र
बंडखोरी करून सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजितदादांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर बरेच दिवस खाते वाटप मागे पडले होते. मात्र कोणत्याही खात्यांची जबाबदारी नसतानादेखील अजितदादांनी विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्यांच्या या कामचेदेखील अनेक स्तरातून कौतूक करण्यात आले होते.
Onion Price: टोमॅटोने महागल्याने सरकार सावध, लासलगावच्या कोल्ड स्टोरेजमध्ये 150 टन कांदा साठवला
पवारांच्या राजीनाम्यादिवशी अजितदादांचीच चर्चा
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी आपण राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे एका कार्यक्रमावेळी जाहीर केले होते. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. उपस्थितांकडून पवारांना राजीनामा मागे घेण्याच्या विनवण्या केल्या जात होत्या. तर जयंत पाटलांना आश्रू आवरणे कठीण झाले होते. यावेळी सर्वच जण गोंधळलेले असताना अजितदादांचा स्वॅग मात्र वेगळाच होता. नावाप्रमाणे अजित पवार ‘दादा’ च्या भूमिकेत असल्याचे आपल्या सर्वांनाच पाहण्यात आले होते.
बंडखोरीनंतर गद्दार म्हणायची हिंमत नाही
गेल्यावर्षी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह ठाकरेंच्या शिलेदारांनी सर्व बंडोखोर आमदारांना ‘गद्दार’ संबोधले होते. मात्र अजितदादांसह राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांबद्दल पवारांसोबत असणाऱ्या नेत्यांनी किंवा अन्य पक्षातील नेत्यांनी गद्दार काय कोणत्याच प्रकारची टीका केली नाही. असे होण्यामागे अजितदादांचा दराराचं आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.