Ajit Pawar : पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर (NCP) आता अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे सीएम होतील अशा चर्चांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ नेते मात्र एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढील निवडणुका लढवल्या जातील असे सांगत आहेत. या घडामोडींवर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहणार आहेत अस फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितल्याची आठवणही सावे यांनी करून दिली.
नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची थेट सीबीआय चौकशीच करा; आमदार बच्चू कडू यांची मागणी
भाजप काँग्रेसमुक्त राज्य करण्याचं स्वप्न पाहत आहे. अजित पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री बनविणार असल्यास भाजपाचं स्वागत करेन असा चिमटा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काढला होता. त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री सावे यांनी प्रतिक्रिया दिली. सावे भंडारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबतही भाष्य केले.
अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार याबाबत क्लिअर केलेलं नाही. त्यांना मुख्यमंत्री करतील हे काही लिहिलं नाही. भविष्यात ते मुख्यमंत्री होऊ शकतात. भविष्य कधीही असू शकतं. 10 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षांनी असे सावे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. यानंतर अजित पवार गटातील नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर..
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर सर्वात आधी पहिला हार मी घालेन, असं असलं तरी सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हाडाच्या भाजपाच्या नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. खरं तर सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्यावर हे प्रत्युत्तर दिले होते. अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे असल्यासे आम्ही त्यांना 5 वर्ष करू असे फडणवीस म्हणाले होते.