Ajit Pawar : राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. खरं तर राजकारणात काय घडामोडी घडतील यावर सारेकाही अवलंबून आहे. दुसरीकडे मात्र कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावत आपल्या भावना व्यक्त करत असतात. याचा अनुभव आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही आला. त्यांचेही भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले फलक झळकले. या प्रकारावर चर्चाही सुरू झाली आहे. या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खोचक टोलेबाजी केली आहे.
नागालँडचे आमदार मुंबईत येणार; अजितदादांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय शक्तिप्रदर्शन
अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. येथे ते गणेश मंडळांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यातच त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना रोहित पवारांच्या बॅनरबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजितदादांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कार्यकर्ते आपल्या नेत्याचे असे बॅनर लावत आहेत. त्यामुळे भावी मुख्यमंत्री व्हायचं कुणी शिल्लकच राहणार नाही. कार्यकर्त्यांना मी आधीही सांगितलं होतं की असे बॅनर लावू नका. कारण, असे बॅनर लावून काहीच उपयोग होत नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळते. अशा प्रकारचे बॅनर कुणी लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण, मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगर 145 चा आकडा गाठावा लागतो. नाहीतर मुख्यमंत्री व्हायचं केवळ दिवास्वप्न राहतं.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर त्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर कार्यकर्त्यांनी लावले आहेत. अशा अनोख्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी रोहितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या बॅनरची राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
Adani Group : शिंदे सरकारकडून अदानी समुहाला मोठे कंत्राट, मुंबई, पुणे अन् बारामतीमध्ये होणार काम
कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. तुम्हाला आठवत असेल मागे एकदा मुंबईत राष्ट्रवादी भवनाच्या बाहेर माझे, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचेही बॅवर लागले होते. हे काही आम्ही कुणी सांगत नाही. मी तर नेहमी सांगत असतो की असं कुणी बॅनरवर भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री लिहून सांगितल्याने होत नाही. कुणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 145 आमदारांचा जादूई आकडा गाठावा लागतो. ज्यांना या 145 आमदारांचा पाठिंबा मिळेल तो मुख्यमंत्री होतो. याआधी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी हा आकडा गाठला, असे वक्तव्य अजित पवार यांनी याआधीही केले होते.