Download App

Ajit Pawar भाजपसोबत म्हणजे महादेवाच्या पिंडीवर विंचू, चप्पल मारायचीही अडचण; शिवतारेंचा टोला

Ajit Pawar : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात अखेर एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी त्यांनी पवार कुटुंब टीका केली. तसेच अजित पवार ( Ajit Pawar ) यांना टोला लगावला. ते म्हणाले की, भाजपसोबत आलेले अजित पवार म्हणजे महादेवाच्या पिंडीवरील विंचू आहे. चप्पल मारायचीही अडचण झाली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात एकच अपक्ष द्या! जरांगेंनी राजकीय पक्ष अन् निवडणूक आयोगाची केली सुटका

शिंदेंच्या विरोधात जात कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिवतारेंनी आपला हा निर्णय पत्रकार परिषद घेत जाहीर केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ही निवडणूक मी लढणारच आहे. मला जनतेचा आशीर्वाद आहे. काही छुपे आशीर्वाद आहेत. कारण नेते देखील माणसंच आहे. त्यांना देखील न्याय अन्याय कळतो. स्वतःला काही करता येत नसेल तर कोणी करत असेल त्याला मदत करावी एवढी सद्सद विवेक प्रत्येकालां आहे.

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीच्या रेड ड्रेसमधील बोल्ड अदांनी लावलं चाहत्यांना वेड

तसेच ते पुढे म्हणाले की, माझ्याबद्दल संभ्रम निर्माण केला जातोय की, विजय शिवतारेवर महायुतीच्या नेत्यांकडून दबाव येईल. ते उभेच राहणार नाहीत. ते काहीतरी सेटलमेंट करतील. मात्र मी सर्व नेत्यांना हात जोडून सांगतो की, ही लढाई मला लढू द्या. ही धर्माची लढाई आहे. राजकारणाचे स्वच्छताकरण करायचं असेल तर हे करावे लागेल.

कारण एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसऱ्या राक्षस मोठा केला तर अडचण होईल. पवार कुटुंबाबद्दल ग्रामीण भागात प्रचंड दहशत आहे. त्यांनी अनेकांना दुखावलं आहे. हा विंचू अनेकांना डसला आहे. तर आता तो महादेवाच्या पिंडीवर म्हणजेच मोदींजवळ गेला आहे. त्यामुळे अडचण अशी झाली आहे. विंचवाला चप्पल मारावी तर महादेवाला देखील लागते. त्यामुळे विंचवालाही मारत येत नाही. ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच फक्त विंचूरूपी अजित पवारच नाही. तर दोन्ही शक्तींचा बिमोड करण गरजेचे असल्याचे माझं मत आहे. असं म्हणत शिवतारे यांनी अजित पवार यांना टोल लगावला आहे.

follow us