Ajit Pawar : राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे हेलिकॉप्टरने नागपूरहून गडचिरोलीला जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले होते. ढगाळ वातावरणामुळं दृश्यमानता अत्यंत कमी झाली होती. मात्र, पायलटने अत्यंत कौशल्याने हेलिकॉप्टर उतवल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर कार्यक्रमात बोलतांना अजित पवारांनी घटलेला किस्सा सांगितला.
Vicky Kaushal: “खतरनाक…”, विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा
अजित पवार म्हणाले, जेव्हा आम्ही येत होतो, तेव्हा खूप ढग होते. नागपुरमधून हेलिकॉप्टरने उड्डाण केले त्यावेळी बरे वाटत होते. मात्र गडचिरोलीजवळ आलो आणि हेलिकॉप्टर ढगात शिरले, तेव्हा माझ्या पोटात मोठा गोळा आला. मी इकडे तिकडे पाहत होतो. घाबरलो होतो. तेव्हा फडणवीस म्हणाले, घाबरू नको. माझे आजवर सहा अपघात झालेले आहेत. अशा अपघातामध्ये मला काही झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला देखील काही होणार नाही. तुम्ही निवांत राहा.पण, मी काळजीत पडलो, पण फडणवीस निवांत होते. मागची काही पुण्याई असेल, त्यामुळेच तुमच्यापर्यंतच पोहोचू शकलो, असं अजित पवार म्हणाले.
विठ्ठला कृपा कर अन् राज्य दुष्काळमुक्त होवू दे, सुजय विखेंचे पांडुरंगाच्या चरणी साकडं
पुढं ते म्हणाले, गडचिरोली हा दुर्गम भाग असला तरी निसर्गाने हा परिसर समृद्ध केला आहे. सुरजागड येथील खाणीत हजारो कोटी रुपयांचे लोहखनिज आहे. आधी लॉयड्स मेटल्सने काम सुरू केले, आता सूरजागड इस्पात या कंपनीने कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यासाठी आपली वडिलोपार्जित 150 एकर जमीन दान केलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांचे विशेष कौतुक करतो. तर उर्वरित जागा कंपनीने खरेदी केल्याची माहिती अजितदादांनी दिली.
दरम्यान, रक्षा बंधनाच्या सुमारास जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आपल्याला महाराष्ट्राच्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यात द्यायचे आहेत. त्यामुळं महिलांचे फॉर्म नीट भरून घ्या, असं आवाहनही अजित पवारांनी केलं.