Download App

दादांना जयंत पाटलांच्या शुभेच्छा! अजितदादा गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा…

Anil Patil : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यांनतर अजित पवार(Ajit Pawar) आणि शरद पवार(Sharad Pawar) गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार(Ajit Pawar) यांनी अर्थमंत्री खात्याबाबत विधान केल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी अजितदादांवर उपरोधिक टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरुनच आता अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटलांनी(Anil Patil) जयंत पाटील यांच्या टीकेवर विधान केल्याने त्यांच्या विधानाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पेन्शनचा प्रश्न चिघळला! लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मतदान करण्याचा ठराव; पेन्शनर्स संघटना आक्रमक

आज माझ्याकडे अर्थखातं आहे, त्यामुळं झुकतं माप मिळतं, पुढे अर्थखातं टिकेल की नाही, सांगता येत नाही, असं विधान अजित पवार यांनी बारामतीतल्या एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. अजित पवारांना नेमकं काय म्हणायंच होतं? याचा राजकीय वर्तुळात अंदाज लावण्यात येत असतानाच जयंत पाटलांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. अजित पवारांवर अन्याय होतोय की, नाही याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा, असं जयंत पाटील म्हणाले होते.

पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर न्या : विरोधातील बातम्या टाळण्यासाठी बावळकुळेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

काय म्हणाले होते अजित पवार?
राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत गेले. सध्या त्यांच्याकडे अर्थखातं आहे. काल अजित पवार यांनी एक आश्चर्यकारक विधान केलं. माझ्या हातात अर्थ खातं आहे, त्यामुळं आपल्याला झुकतं माप मिळतं. पण पुढं ते टिकेल की नाही, हे ठाऊक नाही, असं विधान अजितदादांनी केलं. एवढंच नाहीतर काल गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत असतांना अजित पवार मुंबईत नव्हते, अशात अजित पवार यांनी हे विधान केलं होतं.

कल्याण-डोंबिवली लोकसभेसाठी कोणाला पाठिंबा?; भाजप आमदाराने सांगूनच टाकलं

एकंदरीत या वक्तव्यानंतर अजित पवार गटाचे मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी खळबळजनक विधान केलं आहे. अजित पवार हे नाराज व्हावेत किंवा होऊ नये हे जयंत पाटील यांच्या इच्छेनुसार होत नाही, पण अजितदादांना जयंत पाटील यांच्या शुभेच्छा आहेत एवढं नक्की, असं खळबळजनक विधान अनिल पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जयंत पाटलांबद्दल अनिल पाटील यांनी हा दावा केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अनेकांना संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर अजित पवार आमचेच असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावेळीही राष्ट्रवादीत खरंच फुट आहे की नाही? याचीच चर्चा होती. आत्ताही जयंत पाटलांच्या अजितदादांनी शुभेच्छा असल्याच्या खळबळजनक दाव्याने राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? याचीच राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीयं.

Tags

follow us