Prafulla Patel On Rohit Pawar : सत्तेत असणं महत्वाचं, फक्त विरोधात बसून टोमणे मारल्याने काही होत नसल्याचा टोमणा अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी मारला आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या युवा संघर्षयात्रेला आजपासून सुरुवात झाली. संगमेश्वराच्या महादेवाचा अभिषेक करुन या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. यात्रेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांचे प्रश्न जाणून घेणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावरुन प्रफुल्ल पटेल यांनी टोमणा मारला आहे. पटेल सध्या गोंदिया दौऱ्यावर आहेत. यावेळी पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Girish Mahajan : ‘संजय राऊतांच्या डोक्याचा इलाज करा’; ‘त्या’ वक्तव्यावर महाजनांचा खोचक टोला
पटेल म्हणाले, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे महाराष्ट्राभर युवा संघर्ष यात्रा काढत आहेत. पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राभर फिरुन महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत. अडचणी काय आहेत? याची जाणीव त्यांना व्हावी. त्यामुळेच सत्तेत असणं महत्वाचं असतं, फक्त विरोधात बसून टोमणे मारल्याने काही होत नसल्याचं पटेल म्हणाले आहेत.
आमदार रोहित पवार यांनी आज संगमेश्वराच्या महादेवाला अभिषेक घालून साकडे घालून रोहित पवार यांनी या यात्रेला सुरुवात केली. युवा संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा हा शिरूर हवेली तालुक्यात असणार आहे. दररोज १७ ते २२ किलोमीटर अंतर ही पदयात्रा कापणार असून ४५ दिवस ही पदयात्रा असून, ही यात्रा नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान, रोहित पवार यांना अनेक तरुणांकडून प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Maratha Reservation : ‘सरकारच्या छाताडावरच बसणार’; जरांगे पाटलांचा सरकारला कडक शब्दांत इशारा
याच संघर्षयात्रेवरुन प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवारांबद्दल थेट भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी इतरही विविध मुद्द्यांवर भाष्य करीत विरोधकांना सुनावलं आहे. ते म्हणाले, संजय राऊत काय बोलतात? त्यावर बोलणे हे काही महत्त्वाचे नाही, असं ते म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray : ‘शिवसेना तोडली, राष्ट्रवादीने फोडली अन् मिंध्या लाचारांच्या’.. ठाकरे गटाचा घणाघात
मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी सकारात्मक :
मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. मात्र, आरक्षण असे मिळावं की, जे टिकेल आणि दीर्घकाळ चालेल. यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मराठा समाजाचे आरक्षण हे तांत्रिक आणि न्यायिक बाबींवर सुद्धा टिकेल, यासाठी सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. सध्या कुणबी समाजाचं निजाम काळातील पुरावे असणाऱ्यांना मराठा समाजात समावेश करण्यात आला. परंतु हे आरक्षण दीर्घकाळ टिकणारं, मराठा समाजाला मिळावं, यासाठी सरकारचे प्रयत्नशील असून थोडा मराठा समाजाने धीर आणि संयम दाखवण्याचं आवाहन पटेल यांनी केलं आहे.