Ajit Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शनही घेतले. त्यानंतर जवळपास पाऊण तास बैठक घेतली. या सगळ्या घडामोडीत अजितदादा (Ajit Pawar) गैरहजर होते. त्यांची गैरहजेरी सगळ्यांनाच खटकली आणि राजकीय वर्तुळात चर्चा घडवून गेली. या मुद्द्यावर विरोधकांकडून अजितदादांची कोंडी केली जात असतानाच आता खुद्द अजित पवार यांनीच खुलासा करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
Eknath Khadse : अजितदादांनाही डावललं जात पण.. नाथाभाऊंनी सांगितलं महायुतीतलं पॉलिटिक्स
अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शनिवारी दिवसभर बारामतीमध्ये विविध बैठकांना हजेरी लावल्याचे सांगितले. तो कार्यक्रम पंधरा दिवस आधीच ठरला होता. त्यामुळे आपण याबाबत आपण अमित शाह यांच्या कार्यालयाला तशी माहिती दिली होती. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयांनाही कळवलं होतं. 23 तारखेला मी बारामतीसाठी वेळ दिला होता. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यात सहभागी होता आले नाही. बारामती येथे पाच महत्वाच्या संस्थांची बैठक होती. या बैठकांचा अजेंडा आधीच ठरलेला होता. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी हजर राहता आलं नाही असे अजित पवार म्हणाले.
या मुद्द्यावर विरोधकांनी भाजपसह अजितदादांनाही कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तर थेट अजितदादांना उत्तर देण्याचे आव्हानच दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आहेत. पण, यावेळी अजित पवार उपस्थित नसल्याने चर्चा रंगल्या आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता रोहित पवार म्हणाले, याचं उत्तर स्वतः अजितदादा यांनीच द्यावं. त्यांना महायुतीच्या सत्तेत का डावलण्यात येते आहे का, यावर मी काहीच बोलू शकत नाही असे सांगत त्यांनी या मुद्द्यावर अधिक बोलण्यास नकार दिला.
BJP : कामं करा, नाहीतर राजीनामा द्या; बावनकुळेंच्या निशाण्यावर नेमकं कोण?