Download App

जयंत पाटलांच्या निलंबनावर अजित पवार खुश, पडळकरांचा खोचक टोला

  • Written By: Last Updated:

नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी जयंत पाटलांचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर जयंत पाटलांचे निलंबन झाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार खुश होते. असा खोचक टोला विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी लगावाला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमानंतर, निलंबन झाल्याने अजित पवार खुश होते. त्यांना पहिल्यांदा मी एवढं खुश झालेलं पाहिलं. सरकार गेल्यानंतर पहिल्यांदा अजित पवार खुश होते. ते जयंत पाटलांची बाजू घेत आहेत की, त्यांच्यावर टीका करत आहेत हेच लोकांना कळत नव्हतं. ते खुप आनंदी होते. त्यांच्या लक्षात आलं की, करेक्ट कार्यक्रम झालेला आहे.’ असा खोचक टोला विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी लगावाला आहे.

विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावरील कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन केले.

पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोषच केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ‘आठ दिवस असेच जातील जयंत पाटील पुन्हा येतील…’ ‘हम मे है दम,करेक्ट कार्यक्रम करेंगे हम’ अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या होत्या. निलंबनाच्या घोषणेनंतर जयंत पाटलांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. या निर्लज्ज ‘सरकार’ विरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय…! असं दोन ओळींचं ट्वीट जयंत पाटलांनी केलं.

Tags

follow us