Download App

सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अजितदादा दुसरे अर्थमंत्री, कोणी किती वेळा मांडला अर्थसंकल्प ? यादीच एका क्लिकवर?

Ajit Pawar finance minister: तर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळणारे अजित पवार यांचा अर्थमंत्री म्हणून एक विक्रम होत आहे.

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar finance minister: उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या (Ajit Pawar) सोमवारी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) मांडणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळणारे अजित पवार यांचा अर्थमंत्री म्हणून एक विक्रम होत आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात. विकासयोजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. अजित पवार हे उद्या त्यांचा अकरावा अर्थसंकल्प सादर करणार आहे.


उद्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा, उद्धव ठाकरेंचं CM फडणवीसांना चॅलेंज

राज्यात शेषराव वानखेडे यांनी सर्वाधिक तेरा वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर वानखेडे यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला होता. त्यांनी 1960 ते 1961, 1961-1962 या दोन वर्षे सलग अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर 1964 ते 1970 या कालावधीत अकरा वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थ व नियोजन मंत्री म्हणून हे सोमवारी आपला अकरावा अर्थसंकल्प मांडणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये अजित पवार पाचवेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. 2011 ते 2014 या कालावधीत हे अर्थसंकल्प मांडले. यात एक अंतरिम आणि एक अंतिरिक्त अर्थसंकल्प होता. त्यानंतर काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांनी तीन वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. तर महायुतीत आल्यानंतर अंतरिम आणि अतिरिक्त असे दोन अर्थसंकल्प मांडले आहेत. आता ते सोमवारी अकरावा अर्थसंकल्प मांडणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे तिजोरीवर ताण पडलेला आहेत. तर वित्तीय तूट आहे. त्यामुळे अजित पवार यांचा अर्थसंकल्प कसा असणार आहे हे राज्याचे लक्ष लागून आहे.

उद्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा, उद्धव ठाकरेंचं CM फडणवीसांना चॅलेंज

जयंत पाटील तिसऱ्या क्रमांकावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) यांनी अजित पवार यांच्यापूर्वी दहा वेळेस अर्थसंकल्प मांडला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी सलग दहा वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. हा एक विक्रम आहे. जयंत पाटील यांनी 2000 ते 2008 पर्यंत अर्थसंकल्प मांडला आहे. तर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या काळात यांनी तब्बल नऊवेळा सलग अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांनी 1983 ते 1989 या कालावधीत अर्थसंकल्प मांडला आहे. तर उपमुख्यमंत्री राहिलेले रामराव आदिक यांनीही आठवेळा अर्थसंकल्प मांडलाय. त्यांनी 1980, 1981 या वर्षी दोनवेळा, 1990 ते 1995 या कालावधीत सहा वेळेस अर्थसंकल्प मांडला आहे. ते काँग्रेसमध्ये होते. परंतु शरद पवार यांचे खास होते. सुधीर मुनगंटीवार यांनी सहा वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांनी 2015 ते 2019 या कालावधीत सलग सहावेळा अर्थसंकल्प सादर केलाय. त्यानंतर मधुकर चौधरी यांनी पाच वेळा, यशवंतराव मोहिते यांनी चार वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. तर एकनाथ खडसे यांनी युती सरकारच्या काळात तीनवेळा अर्थसंकल्प मांडलाय.
————–
कोणी किती वेळा मांडला अर्थसंकल्प मांडला.
अर्थमंत्री किती वेळा
1) शेषराव वानखेडे 13
2) अजित पवार 11
3) जयंत पाटील 10
4) सुशीलकुमार शिंदे 9
5) रामराव आदिक 8
6) सुधीर मुनगंटीवार 6
7) मधुकर चौधरी 5
8) यशवंतराव मोहिते 4

follow us