उद्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा, उद्धव ठाकरेंचं CM फडणवीसांना चॅलेंज

Uddhav Thackeray Criticized BJP Devendra Fadanvis : मुंबईत कालिदास नाट्यगृहात पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे निर्धार शिबीर आयोजित केले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलंय. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, आपला आवाज दिल्लीच्या कानांचे पडदे फाडून टाकणार आहे. त्यांनी दोन्ही राऊत बंधूंचे आभार मानलेत. ते म्हणाले की, पुढील दिशा माहित नाही, पण पावले मात्र टाकली आहेत. शिवसेनेप्रमुख म्हणायचे मी म्हणेल ती पूर्व. यावेळी ते म्हणाले की, विरोधकांची दांडी उडवायची आहे. ही मॅच दुबईत सुरू आहे. परंतु याआधी मॅच हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये झाली. ती बघायला शिवसेनेप्रमुखांचे (Shiv sena) विचार मानन्याऱ्यांचे काही कार्टी गेली होती. परंतु याजागी आदित्य असतात, तर नरकातून यांच्या पितरांनी थयथयाट केला असता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.
भाजप (BJP) फेक नरेटिव्ह पसरवणारा आहे, असा उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. ज्यांचं स्वातंत्र्य लढ्याची काहीही संबंध नव्हता, त्यांच्या हातात देशाची सुत्रं गेलीत. त्यांना स्वातंत्र्याचं महत्व कसं कळणार, असा सवाल त्यांनी केलाय. हातात लाठ्या काठ्या घेवून स्वत:च्या गच्चीत कपडे वाळत घालणारे हे लोक, अशी टीका ठाकरेंनी आरएसएसवर केली आहे. त्यांचं भाकड तत्वज्ञान आहे. त्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी देखील काहीही संबंध नव्हता.
‘माझ्या जन्मदात्या आईवर खोटे आरोप…’ धनंजय मुंडे भडकले, इशारा नेमका कोणाला?
घाटकोपरची भाषा गुजरातची आहे, असं अनाजीपंत जोशी म्हणालेत. तुमच्या बापाने आम्हाला मुंबई दिलेली नाही, मुंबई मराठी माणसाची आहे असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. अधिवेशन सुरू आहे. माझ्या राज्याचं नुकसान होवून, मालकाच्या मित्रांचे खिसे भरणाऱ्या कामांना स्थगिती द्यायला तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, ते देवेंद्र फडणवीस सारख्या येड्या गबाळ्याचं काम नाही. लोक उद्धव ठाकरे होवू शकत नाही. देवेंद्रजी तुम्हाला (Devendra Fadanvis) उद्धव ठाकरे व्हायचं असेल, तर उद्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. मी माझ्या वचननाम्यातील पहिल वचन अर्थसंकल्पात पूर्ण केलं होतं.
वचननाम्यातील वचनं खरी करून दाखवा. लाडक्या बहिणींना 2100 रूपये द्या. तुम्ही सगळं काही पळवून गुजरातला नेताय. तुमचे मालक तिकडे बसले आहेत. गुजराथी लोकांसोबत आमचा काही वाद नाहीये. परंतु इकडे प्रांतीय वाद सुरू केला जात आहे. मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतोय, कधीतरी आपण आपली खेकड्याची प्रवृत्ती तोडून पुढे जाणार आहोत की नाही, हा निर्धार या शिबीरात करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय.
‘ संतोष देशमुख हत्या… त्यामागे धनंजय मुंडेच’, अंजली दमानिया यांनी नवीन बॉम्ब फोडला
राज्य तर पुन्हा आणणारच. यांना असं तसं सोडणार नाही. आम्ही जय श्रीराम बोलूच, पण भाजपवाल्यांना देखील ‘जय भवानी जय शिवाजी’ बोलायला लावूच, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिलाय. जो कोणी महाराष्ट्राच्या मुळावर येईल, त्याचा कपाळमोक्ष करण्याची ताकद मराठी माणसांत आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आमच्यासोबत मुस्लिम आले तर वोट जिहाद आणि दुसरीकडे मोहन भागवत मस्जिमध्ये जातात, असा त्यांनी टोला लगावला आहे.