Download App

अजितदादांवर कारवाई करणार का? जयंत पाटलांचे एका वाक्यात उत्तर

  • Written By: Last Updated:

 NCP  Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड करत आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. जयंत पाटील म्हणाले की, पक्षातील काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यते शिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा कार्यक्रम झालेला आहे. यावेळी त्यांनी अजितदादांवर कारवाई करणार का यावरदेखील उत्तर दिले आहे.

आम्ही कारवाईच्या संदर्भात अजून त्यावर अभ्यास केलेला नाही. त्याबाबत योग्य ती पाऊलं यथावकाश आम्ही टाकू असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले आहे. या अगोदर गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी  आपल्या ४० आमदारांसह भाजप सोबत सरकार स्थापन केले होते. त्यानंतर तेव्हाच्या शिवसेनेकडून एकनाथ यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यामुळे आता अजित पवारांवर देखील कारवाई होणार का याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

यावेळी पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातले कार्यकर्ते एकसंघ पणाने शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत. ही भूमिका जागोजागी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा व्यक्त करतात. मला खात्री आहे की आज जो शपथविधी झाला त्याला ज्या सदस्यांना बोलवून घेण्यात आलं त्यांच्या कशावर सह्या घेतल्या अजून आम्हाला कळलेलं नाही,असं पाटील म्हणाले.

‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

तसेच त्यातले बरेच सदस्य जे टीव्हीवर दिसत होते, त्या कार्यक्रमात त्या सर्वांनी शरद पवार साहेबांना भेटून यासंदर्भात आम्ही गोंधळलेलो होतो अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. ते पवार साहेबांशी बोललेत. काही आमदार माझ्याशी बोललेले आहेत आणि त्या सर्व आमदारांचे कन्फ्युजन असल्याचे पाटील यांनी सांगितले. यानंतर महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना बुधवारी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांची ५ तारखेला बैठक बोलावल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us