Maharashtra Politics : आज महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) होणार आहे. नव्या सरकारमध्ये देखील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस यांची बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटपाबाबत शिंदेंनी मोठी अट घातली असल्याचे समजते. त्याच वेळी अजित पवारांनीही (Ajit Pawar) खातेवाटपाबाबत भाजपसमोर अट ठेवल्याचं पुढं आलं.
Pavana Dam : पाण्याचा अंदाज चुकला; दोघांचा जीव मुकला…
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या दिमाखदार शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 19 राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं सर्वांचे लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे लागले. अशातच बुधवारी रात्री मुंबईत महायुतीत्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत भाजपसमोर एक अट ठेवल्याचे समोर आले आहे.
सत्तास्थापनेनंतर पहिला निर्णय ‘लाडकी बहीण योजने’चा ; दीपक केसरकरांनी काय सांगितलं?
महायुतीच्या खातेबवाटपाबाबत राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मंत्रिपदे फायनल करा, त्यांनंतर आम्ही आमच्या मंत्रिपदांची चर्चा करू, असं अजितदादांनी फडणवीसांना कळवल्याचं समजते. त्यामुळं काल वर्षा बंगल्यावर फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक पार पडल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं कायम राहणार यासोबतच एकनाथ शिंदेंना जितकी खाती मिळतील तितकीच खाती आम्हाला मिळायला हवीत, ही आमची भूमिका असल्याचं राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाकडून यंदा मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांऐवजी काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे.
शपथविधी सोगळ्यांपूर्वी हालचालींना वेग आला. अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर आज सकाळपासून गडबड दिसयेय. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येऊन त्यांचे अभिनंदन करत आहेत.
दरम्यान, आज महायुतीच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी पुन्हा एकदा अमित शहा आणि महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याचे समजेत. या बैठकीत खातेवाटपाबाबत चर्चा होणार का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.