Pavana Dam : पाण्याचा अंदाज चुकला; दोघांचा जीव मुकला…
Pavana Dam : पुण्यातील मावळ तालुक्यातील पवना धरणात (Pavana Dam) दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडलीयं. दोन तरुणांपैकी एका तरुणाचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश आलं असून हे दोन्ही तरुण बालेवाडीतील खाजगी कंपनी नोकरीला होता. पवना धरण परिसरात ते फिरण्यासाठी आले होते, पाण्यात पोहण्यासाठी हे दोघे उतरले होते. मात्र, पाण्याच्या अंदाज चुकल्याने दोघेही बुडाले आहेत.
राज्यात नव्या सरकारचा आज ग्रॅंड शपथविधी सोहळा, देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
पवना धरणाच्या पाण्यात मित्र पोहोण्यास उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मयूर भारसाके आणि तुषार आहेर हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. आपले मित्र डोळ्यादेखत पाण्यात बुडत असताना मित्रांनी आरडाओरड केल्यावर स्थानिक ग्रामस्थ आणि लोणावळा ग्रामीण पोलीस तसेच शिवदुर्ग रेस्क्यू टीमने या दोघांचा पवना धरणाच्या पाण्यात शोध घेतला. रात्री उशिरा मयूर याचा मृतदेह शोध पथकाला सापडला असून तुषार अहिरे याचा शोध अजूनही सुरूच आहे.