Rajesh Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. चंदगड येथील नागरी सत्कार समारंभात त्यांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. या मतदारसंघातून अजितदादा गटाचे राजेश पाटील (Rajesh Patil) यांचा पराभव झाल्यामुळे अजितदादांनी फेटा बांधायचं टाळलं. त्यामुळं राजेश पाटील भावूक झाले.
…तरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ शकतात; विकास लवांडेंनी सांगितला फॉर्म्युला
चंदीगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील यांचा पराभव झाला, त्यामुळं अजितदादांनी फेटा बांधला नाही. दादांनी फेटा बांधला नाही म्हणून पाटील यांना अश्रू अनावर झाले. बोलताना त्यांचा हुंदका दाटून आला. ते म्हणाले, माझा पराभव होऊन पाच महिने लोटले तरीही जिल्हा नियोजनमधून दिलेली काम मला जूनपर्यंत आटोक्यात आणता येणार नाहीत, एवढी कामं मुश्रीफांनी मला दिली. दादा तुम्ही माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर नाराज आहात. तुम्ही आज फेटा देखील बांधून घेतला नाही. तुम्ही फेटा स्विकारला नाही ही खंत मनामध्ये राहील. मात्र, दादा मी तुम्हाला शब्द देतो की, या विधानसभेला एका राजेश पाटलाचा पराभव झाला आहे. पण, जर मतदार संघाची पुनर्रचना झाली तर याच मतदारसंघातून दोन आमदार निवडून दिल्याशिवाय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, असं पाटील म्हणाले.
मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजनांची गरज नाही, जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
सर्व काही सुरूळीत असताना माती कुठं शिंकली, हे मला माहिती नाही. पण, ही जनता काय आपल्यासोबत राहिल, असंही पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तरच आपण मतदार संघासाठी काहीतही द्या म्हणू शकतो, असं म्हणत पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
अजित पवार काय म्हणाले?
मी आज कोल्हापूरी फेटा बांधून घेतला नाही. याचं कारण म्हणजे, माझा उजवा हात असलेला राजेश या ठिकाणी पराभूत झाला. राजेशला पुन्हा आमदार करा, तुम्ही म्हणाल तितके फेटे बांधून घेईल. राजेश पाटील यांच्या पराभवाबद्दल मला वाईट वाटते. आम्ही या मतदारसंघाला १६०० कोटींचा निधी दिला. मात्र, येथील नागरिकांनी राजेश पाटील यांचा पराभव केला. जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले, परंतु राजेश पाटील यांचा पराभव झाला. गड आला पण सिंह गेला, अशी भावना यावेळी अजितदादांनी बोलून दाखवली.