Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. त्यावर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. या सुनावणीवेळी स्वतः शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषदेत यामुळे वेदना होत असल्याचे म्हटले होते. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात हे ऐकून डोळ्यांत पाणी आलं असे आव्हाड म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेदना आणि आव्हाड कधी जुळतं का? मी न बोललेलच बरं असं म्हणत अजित पवारांनी त्यांना टोला लगावला. अजित पवारांनी या मुद्द्यावर अधिक बोलणे टाळले. तरी देखील त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.
विखेंच मोठं विधान…. येत्या सहा महिन्यांत ‘स्टॅम्प पेपर’ बंद होणार
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटांत संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगासमोर 6 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी पक्षासंदर्भात सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी शरद पवार आणि अजित पवार गटाने आपली भूमिका मांडली. सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच असल्याचा दावा केला असून अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे अजित पवार गटानेही आपली बाजू मांडत शरद पवार पक्षात मनमानी कारभार करतात. मर्जीनुसार पक्ष चालवत असल्याचे म्हटले होते. अजित पवार गटाचा हा युक्तिवाद आव्हाडांच्या जिव्हारी लागला. त्यांनी यावर पत्रकार परिषद घेत अजित पवार गटाला सुनावलं. तसेच ते या पत्रकार परिषदेत भावूक झाल्याचेही दिसून आले.
अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर, राष्ट्रवादी शरद पवारांचीच; अभिषेक मनु सिंघवींचा दावा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष मर्जीनुसार पक्ष चालवतात हे ऐकून डोळ्यांत पाणी आलं. ज्यांनी झाड लावलं मोठं केलं त्यांनाच हे आज भोगावं लागतंय असे आव्हाड या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर अजित पवार यांनी मोजक्या शब्दांत उत्तर देत आव्हाडांना खोचक टोला लगावला. दरम्यान, राष्ट्रवादी प्रकरणातील पुढील सुनावणी उद्या (9 ऑक्टोबर) होणार आहे. या सुनावणीत दोन्ही गटांकडून आणखी काय युक्तिवाद केले जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.