Download App

पुण्यात राष्ट्रवादीचीच ताकद, अजित पवारांनी काँग्रेसच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले !

Ajit Pawar Said NCP is stronger than Congress in Pune : दिवंगत भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुण्यातील लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. या जागेवर कॉंग्रेसने (Congress) दावा ठोकला. मात्र, मविआत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला ती जागा लढवता येईल, पुण्यात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची (NCP) ताकद जास्त आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळं या कॉंग्रेसची धाकधुक वाढली आहे.

अजित पवार यांनी सांगितलं की, 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीला एक वर्षांपेक्षा कमी कालावधी असल्याने ही निवडणुक होणार नाही, असं असं वाटलं होतं. मात्र निवडणूक घेण्यास आयोग कायदेशीरदृष्ट्या बांधील आहे, त्यामुळे ही निवडणुक लागू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

‘संसद भवन लोकशाहीतलं मंदिर, त्याचा इव्हेंट करू नका; सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते माजी आमदार मोहन जोशी यांनीही आम्ही या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. याविषयी अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, की, ज्या पक्षाची ताकद जास्त त्यालाच ही जागा मिळावी, असे त्यांनी सांगितले. आता कोणत्या पक्षाची किती ताकत आहे, हे पाहण्यासाठी मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकांची माहिती घेतली तर साधारण कोणाला किती मते पडली, याची माहिती घेतल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुणे लोकसभेवर दावा ठोकला.

महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती असतांनाच मात्र, अजित पवार यांनी पुन्हा एकदा पुण्याच्या जागेवर दावा केल्याने मविआत संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांचा मुलगा किंवा सून यांना तिकीट दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल, अशीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, ही निवडणुक झाल्यास या जागेवरून मविआतील कोणता पक्ष आपला उमेदवार देईल, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us