Ajit Pawar Slams Volunteers In Pimpari Chichwad Police Programme : पिंपरी चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. यावेळी पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. तेव्हा खाली बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी अतिउत्साह दाखवत कार्यक्रमामध्ये शिट्ट्या वाजवल्या. त्यावरून मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पारा चांगलाच वर चढला. तेव्हा अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं.
साता समुद्रापार मराठी ‘संस्कृती’चा डंका, यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये ‘करेज’चं विशेष कौतुक
अजित पवारांच्या तंबीनंतर कार्यकर्त्यांनी लगेच शिट्ट्या वाजवणं बंद केलं. त्यानंतर मात्र सगळा कार्यक्रम सुरळीत पार (Pimpari Chichwad) पडलाय. पिंपरी चिंचवड येथील पोलीस आयुक्तालय भूमिपूजन कार्यक्रम होता. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडलाय. थेट माईक हातात घेवून अजितदादांनी कार्यकर्त्यांचा समाचार घेतलाय.
या अतिउत्साही कार्यकर्त्यांना दादांनी चांगलंच सुनावले, कार्यक्रम पोलीसांचा आहे. शिट्ट्या वाजवल्या ना तर पोलिसांना उचलायला सांगेन. काय चाललंय, मुख्यमंत्री येथे आलेत ना. हा काय शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे का? शिस्त बिस्त काही आहे का नाही? या भाषेतच अजित पवारांनी भर कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले आहेत. या कार्यक्रमासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, विजय शिवतारे, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, शरद सोनवणे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे यांसह इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
VIDEO : ते माझे काकाच…दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र केसरी, पृथ्वीराज मोहोळ यांनी केला मोठा खुलासा
यावेळी बोलताना अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय. 730 कोटींचे कार्यक्रम आज पुण्यात होत आहेत, असं ते म्हणालेत. महायुतीने उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून, सुविधा द्यायच्या असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याचं ते म्हणाले आहेत. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही आयडिया कॉम्पिटिशन लावतो. कोणालाही काम देत नाही, तर चांगल्यातल्या चांगला प्लॅन ठरवतो. कारण सरकारची ती इमारत आहे, सर्वसामान्य माणूस तिथे प्रश्न सोडवायला येत असतो असं देखील अजित पवार म्हणतात.
आरोपी पकडल्यानंतर त्याची धिंड काढा. अख्ख्या शहराला कळलं पाहिजे, कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही अन् कोण छोट्या बापाचा नाही, असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.