Download App

ते चालतात, आम्ही का नाही ? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर एकमेंकावर जोरदार टीका-टिप्पणी केली जात आहे. आता अजित पवार व शरद पवार हे एकमेंकावर टीका करत आहे. मध्यंतरी आम्ही जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. आता त्याला माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

कोल्हापूर महापालिकेला नवा आयुक्त मिळाला! सिंधुदूर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती…

अजित पवार म्हणाले, काही वेळेस विचारधारा वेगळी असते. जसे 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने विचारधारा बाजूला ठेवून शिवसेनेशी आघाडी केली होती. शिवसेना-भाजप हे 25 वर्षांपासून मित्रपक्ष होते. त्यांचा मित्र पक्ष अडीच वर्ष चालू शकतो. तर दुसरा राहिलेला मित्रपक्ष का चालू शकत नाही. आम्ही वेगळे आहोत. हे दाखवायला नको. शेवटी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. शेवटी लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. तेही मानले पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

कोल्हेंचे आंदोलन टाळून अतुल बेनके थेट दिल्लीत; पुण्यातील आठवा आमदार अजितदादांच्या गोटात?

शरद पवार हे अनेक भागात स्वाभिमानी सभा घेणार आहेत. त्यावर अजित पवारांनी हा त्यांचा अधिकार आहे. ते सभा घेतील, असे उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीत अजूनही इनकमिंग
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याबरोबर जास्त आमदार आहे. येत्या काळात आणखी लोक पक्षात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बेरजेचे राजकारण करणार आहे. पक्ष वाढविण्यासाठी अनेकांना प्रवेश दिला जाणार आहे. अनेक जण पक्षात येणार आहे. शेवटी हा सर्व जाती धर्माचा पक्ष आहे. हीच ओळख पुढे कायम राहिल. त्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यासाठी मंत्र्यांवर अनेक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Tags

follow us