तर आधी तुम्ही पडाल म्हणणाऱ्या संजय राऊतांना अजितदादांचं एका वाक्यात उत्तर, ‘सोम्या गोम्याच्या….’

Ajit Pawar On Sanjay Raut : काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडण्याचं चॅलेंज दिलं होतं. हाच धागा पकडून कोल्हे यांनी काढलेल्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’च्या सांगता सभेत बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. हवा बहूत तेज चल […]

Ajit Pawar On Sanjay Raut

Ajit Pawar On Sanjay Raut

Ajit Pawar On Sanjay Raut : काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडण्याचं चॅलेंज दिलं होतं. हाच धागा पकडून कोल्हे यांनी काढलेल्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’च्या सांगता सभेत बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. हवा बहूत तेज चल रही है, अजितराव… टोपी उड जायेगी, असं म्हणत शिरूर मतदारसंघात कोल्हेंचीच हवा असल्याचं राऊतांनी अधोऱेखित केलं होतं. त्यावर आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

दिलासादायक बातमी! वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किंमतीत कपात, जाणून घ्या आजचे दर 

कोरेगाव भीमा येथे आज 206 वा शौर्य दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने जमले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता अजितदादांनी एकाच वाक्यात विषय संपवला. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, अशा मोजक्या शब्दात त्यांनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं.

कोरेगाव-भीमामध्ये भीम अनुयायांची गर्दी, अजित पवारांनीही केलं विजयस्तंभाला अभिवादन

महाराष्ट्रातील अनेक उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधक करत आहेत. आता सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पही गुजरातला जात असल्याचे वृत्त आहे. यावरूनही विरोधकांनी सरकारवर टीका केली. यावरही अजित पवरांनी भाष्य केलं. ते म्हणाले, खुद्द मुख्यमंत्र्यांनी काल याबाबत माहिती देऊन पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात नाही, हे सांसिगितलं. राज्यातून काहीही उद्योग बाहेर गेले नाहीत. प्रकल्प बाहेरच्य राज्यात जातीलच कसे… प्रकल्प बाहेर जात असतील तर आम्ही गप्प तरी कसू राहू. आता निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाही. त्यामुळं हे मुद्दे काढले जात आहे. विरोधकांकडून तरुणाईच्या मनात रोष कसा निर्माण होईल, यासाठी प्रयत्न केला जात आहेत. कालच मी मुख्यमंत्र्याचं निवेदन ऐकलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही, असं अजित पवार म्हणाले.

डीपीडीसीच्या निधी वाटपावरून भाजपच्या डीपीडीसी सदस्यांनी लेखी स्वरूपात नाराजी व्यक्त केली होती. तसं पत्र विभागीय आयुक्तांना त्यांनी दिलं. त्याविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील डीपीडीसीचा निधी वाटपाची सूत्रे ठरवली आहेत. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात देखील निधीचं वाटप करण्यात आलं, असं म्हणत डीपीडीसीच्या निधी वाटपाचा चेंडू भापजच्या कोर्टात टोलवला आहे.

दरम्यान, खासदार राऊतांनी अजित पवारांवर टीका करतांना आमच्या पाडापाडीच्या खेळात पडला तर तुम्ही पहिले पडाल अशी टीका केली होती. त्याला आता अजित पवारांनी सोम्यागोम्याच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही, अशी खोचक टीका केली. त्यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version