Download App

पळवाट म्हणून शरद पवारांनी शेळकेंना टार्गेट केलं; अजित पवारांची सडतोड टीका

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Ajit Pawar : लोणावळ्यातील मेळाव्यात बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर कार्यकर्त्यांवर दमदाटी केल्याचे आरोप केलं. इतकचं नाही तर तू आमदार कुणामुळं झाला, तुला सोडणार नाही, मलाही शरद पवार म्हणतात, असा इशारा पवारांनी दिला होता. तर दमदाटी केलेल्याला समोर आणा, असं खुल चॅलेंज शेळकेंनी दिलं होतं. दरम्यान, आता यावर सर्वांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली.

Loksabha Elections 2024 : 80 टक्के काम पूर्ण, 20 टक्के उमेदवारांबाबत आम्ही तिघे… फडणवीसांनी केलं स्पष्ट 

आज पुण्यातील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिज्युअल प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी अजित पवार पुण्यातील नवीन टर्मिनलच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शेळकेंवर दमदाटी केल्याचा आरोप होत आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारांनी आरोप केल्यानंतर लगेच सुनील शेळके यांच्याशी बोललो. सुनील शेळके म्हणाले, दादा, तुम्ही मला ओळखता, तुम्हीच मला तिकीट दिले आहे. मी कुणालाही दम दिल्या नसल्याचं शेळकेंनी मला सांगितलं. शेळकेंनी कुणालाही दम दिला नाही. त्यांनी सगळी वस्तुस्थिती मला सांगितली. लोणावळ्यातील कार्यक्रमात फार कमी लोक सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमाला नगण्य उपस्थिती होती, त्यामुळं पळवाट म्हणून शरद पवारांनी सुनील शेळकेंना टार्गेट केलं.

‘…तर मी तुमच्यासोबत नसेल’, भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार का? 

काय म्हणाले शरद पवार?
आमदार सुनील शेळके यांच्यावर हल्लाबोल करताना शरद पवार म्हणाले होते की, शेळके तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, अशा शब्दात पवारांनी शेळकेंवर टीका केली.

उद्या जागावाटप निश्चितत होणार
महायुततीच्या 48 जागांवर निर्णय झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत मी दिल्लीला जाणार आहे. त्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. उद्या जागावाटप निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल.

follow us

वेब स्टोरीज