Download App

Ajit Pawar सर्व गणपतींना गेले, पण ‘वर्षा’वर जाणं टाळलं, शिंदेंचे विश्वासू म्हणतात…

  • Written By: Last Updated:
Image Credit: Ajit Pawar

Ajit Pawar : गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच पवारांनी गणेशोत्सवा (Ganeshotsava)दरम्यान शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जावून गणपतीचं दर्शन घेणं टाळलं. अजित पवारांनी लालबाग, सिध्दीविनायकाला भेट दिली. पण, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे पाठ फिरवली. त्यामुळं पवार नाराज आहेत, या चर्चेला आणखीणच मिळालं. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या एका नेत्याने या प्रकरणी खाजवून खरूज आणू नका, असं विधान करत या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 10 दिवस गणरायाची सेवा केल्यानंतर गुरुवारी (28 सप्टेंबर) गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वर्षा बंगल्यात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दहा दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

उद्योगपती मुकेश अंबानीपासून ते शाहरुख आणि सलमान खानपर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यात मागे राहिले नाहीत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदेंच्या गणपतीचे दर्शन घेतलं नाही. यामुळं ते नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली आहे.

आता कंत्राटी तहसीलदार ! जळगावमध्ये भरतीच्या जाहिरातीचा ‘श्रीगणेशा’, अनेक पदे भरणार 

10 दिवसांच्या गणेशोत्सवात अजित पवार यांनी मुंबईतील लालबागच्या राजासह सिद्धिविनायक मंदिरालाही भेट दिली. एवढेच नाही तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. मात्र त्यांनी शिंदे यांच्या घरी जाण्याचे टाळले. याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगलीये.

दुसरीकडे, या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता, त्यांनी शिंदे व पवारांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत. या खूप छोट्या गोष्टी असतात. नेमंक अजित पवार त्यावेळी मुंबईत नसतील. पुण्यात असतील किंवा काही वेगळ्या गोष्टी असतील. त्यांच्याकडून चुकून राहून गेलं असेल. त्यामुळे त्यांनी जाणे टाळणे, अशी चर्चा करणं म्हणजे, खाजवून खरूज काढणं आहे, असं ते म्हणाले.

यापूर्वी अजित पवारांनी फिरवली पाठ
विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमांकडे अजित पवारांनी पाठ फिरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. यानंतर अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यात दिसले नाहीत. यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्याचे टाळल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.

follow us

वेब स्टोरीज