Mahrashtra Gov : आता कंत्राटी तहसीलदार ! जळगावमध्ये भरतीच्या जाहिरातीचा ‘श्रीगणेशा’, अनेक पदे भरणार
जळगाव : राज्य सरकार (State Goverment) अनेक विभागात कंत्राटी भरती (contract recruitment) करणार आहे. त्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. कंत्राटी भरतीवरून सरकार व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. आता तर तहसील, मंडळाधिकारीपासून इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) कार्यालयाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उपविभागीय कार्यालयांमध्ये ही भरती केली जाणार आहे. सेवानिवृत्त तहसीलदार, नायब तहसीलदारांची भरती केली जाणार आहे.
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी, आता महिलांना मिळणार ३३ टक्के आरक्षण
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाबरोबर जळगाव, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव उपविभागीय कार्यालयांमध्ये ही भरती केली जाणार आहे. तब्बल 63 जागांची कंत्राटी भरती होणार आहे. तहसीलदार व नायब तहसीलदारांच्या आठ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी चाळीस हजार रुपये महिन्याला मानधन देण्यात येणार आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. 68 वर्षांपर्यंतचा व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. या दोन्ही पदावर कमीत कमी तीन वर्ष काम केल्याचा अनुभव अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.
Pune Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणूक पाहणं ठरलं जीवघेणं; चिमुकला जीवाला मुकला…
सेवानिवृत्त अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, टंकलेखक पदाच्या पंधरा जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी महिन्याला 25 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या पदासाठी 68 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा ठेवण्यात आली. तर तर कॅम्प्ट्युर ऑपरेटरचे तीस पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी सोळा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी वयोमर्यादा ही 22 ते 45 वर्षही वयोमर्यादा आहे. तर शिपाईपदाच्या दहा जागा आहे. त्यासाठी 18 ते 45 वर्ष मयोमर्यादा आहे. तर बारा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
सहा महिन्यांसाठी ही कंत्राटी भरती आहे. त्यात प्रथम तीन महिने आणि आवश्यकता असल्यास पुढील तीन महिने असा सहा महिन्यांचा नोकरीचा कालावधी आहे.
हमीपत्र घेणार, दौऱ्याचा खर्च मिळणार का ?
तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेली सेवा पार करण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा, यासाठी संबंधितांकडून हमीपत्र घेतले जाणार आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय गोपनियता पाळावी लागणार आहे. अनेकदा अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावांगावामध्ये दौरे करावे लागतात. या दौऱ्यासाठी कोणत्याही प्रवासभत्ता व दैनिक भत्ता मिळणार नाहीत, अशा अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.