Sunil Tatkare On Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामती (Baramati) मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु होती मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामतीमधूनच निवडणूक लढणवणार असल्याची घोषणा केली आहे. ते आज माध्यमांशी बोलता होते.
यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणार. बारामतीकरांच आणि अजित पवार यांच अतूट नातं आहे. अजित पवार हे बारामती विकासकामांचे महामेरू आहेत. अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवावी ही बारामतीकरांची इच्छा आणि त्यामुळे अजित पवार बारामतीमधूनच निवडणूक लढणवणार हे मी सांगतो. असं माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले.
तसेच त्यांनी यावेळी रामराजे निंबाळकर यांची अजित पवार यांच्याशी चर्चा होणार आहे. माझं देखील त्यांच्याशी काल बोलणं झालं आहे. निवडणूक जवळ आल्या की इकडे तिकडे होतच असत. पुढील पाच ते सहा दिवसामध्ये अनेक घडामोडी होईल असं देखील ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
तसेच शरद पवार यांनी याबाबत संकेत देखील दिले आहे.त्यामुळे आता पुढील पाच – सहा दिवसात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर येत्या काही दिवसात महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होणार आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने साहजिकच भाजपला सर्वाधिक जागा भेटणार असेही ते म्हणाले.
तर कागलमधून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र मंडलिक यांनी निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे.
हरियाणा विजयानंतर भाजपाचं राहुल गांधींना गिफ्ट; घरी धाडली ‘ही’ खास भेट
यावर सुनील तटकरे म्हणाले की, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत मात्र काहींना राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर काय चर्चा होतात हे माहिती नसते त्यामुळे त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र आमच्या महायुतीचे जागावाटप फार पुढे गेला आहे आणि येत्या चार दिवसात राहिलेल्या जागा वाटपाबाबत तिढा सुटेल असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.