हरियाणा विजयानंतर भाजपाचं राहुल गांधींना गिफ्ट; घरी धाडली ‘ही’ खास भेट

हरियाणा विजयानंतर भाजपाचं राहुल गांधींना गिफ्ट; घरी धाडली ‘ही’ खास भेट

Haryana Elections 2024 : हरियाणात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भाजपने मोठा विजय साकारला. हरियाणाच्या जनतेनं थेट (Haryana Elections) बहुमत देत राज्याचा कारभार पुन्हा भाजपाच्या हाती सोपवला आहे. या विजयानंतर भाजप संघटना आणि कार्यकर्त्यात साठलेला निरुत्साह झटकला गेला. कार्यकर्ते आणि पूर्ण पक्षच चार्ज झाला आहे. ठिकठिकाणी हरियाणा विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. याच जल्लोषात एक खास घटना घडली आहे. ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

हरियाणातल्या विजयाचा आनंद साजरा करण्याच्या नादात भाजपने थेट काँग्रेसच्या मुख्यालयात (Congress Party) जिलेबी पाठवली आहे. ही मिठाई कोणत्या मैत्री किंवा आनंदात नाही तर राहुल गांधींना जशास (Rahul Gandi) तसं उत्तर म्हणून पाठवली आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात गोहाना येथील जाहीर सभेत राहुल गांधींनी येथील एका स्थानिक दुकानातील जिलेबीचा उल्लेख केला होता. त्यांचं वक्तव्य निवडणूक काळात प्रचंड व्हायरल झाला होतं. निवडणुकीच्या आधी देखील जिलेबी सोशल मिडियावर ट्रेंड करतच होती. याच जिलेबीवरून आरोप प्रत्यारोप देखील भरपूर झाली होती.

जनतेला डबल इंजिन सरकार हवे, महाराष्ट्रात हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती होणार, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

जिलेबीचा हा मुद्दा हरियाणाच्या निवडणुकीत टॉपवर राहिला. आता काँग्रेसचा पराभव झालाय म्हटल्यानंतर भाजपने संधी साधली आहे. हरियाणा भाजपने एक खोचक ट्विट केलंय. यात राहुल गांधींच्या घरी जिलेबी पाठविणार असल्याचे म्हटले आहे.

जिलेबीच्या वेढ्यात काँग्रेस फसलीच

भाजपने खोचक ट्विट केलं. यात म्हटले आहे की “हरियाणाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने राहुल गांधींच्या घरी जिलेबी पाठवून दिली आहे.” भाजपाचं हे ट्विट चांगलच व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये जिलेबीच्या ऑर्डरबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याचा स्क्रिन शॉटही यात जोडण्यात आला आहे. जिलेबीची ऑर्डर कनॉट प्लेस येथील बीकानेरवाला स्वीट्स या दुकानातून देण्यात आली होती. यावर जिलेबीची 609 रुपये अशी किंमतही लिहिली आहे.

राहुल गांधींना पाठविण्यात आलेली जिलेबी जवळपास एक किलो होती. भाजपने या जिलेबी ऑर्डरचा जो स्क्रिन शॉट शेअर केला होता त्यात जिलेबीची किंमतही होती. हरियाणातील भाजपाचा विजय आणि काँग्रेसचा पराभवानंतर उत्तर प्रदेशातील भाजप नेत देखील राहुल गांधींवर खोचक टीका करत आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात गोहाना येथील एका सभेत जिलेबीचा उल्लेख केला होता. मी दीपेंद्र आणि बजरंग पुनियाला सांगितलंय की ही जिलेबी संपूर्ण भारतात गेली पाहिजे. जर ही जिलेबी देश आणि विदेशात गेली तर या जिलेबीवाल्याची दुकान फॅक्टरीतही रुपांतरीत होऊ शकते. यातून हजारो लोकांना रोजगारही मिळू शकतो.

हरियाणातील व्हिक्ट्रीने महाराष्ट्र, झारखंड अन् दिल्लीत भाजपला मिळणार बूस्ट..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube