हरियाणातील व्हिक्ट्रीने महाराष्ट्र, झारखंड अन् दिल्लीत भाजपला मिळणार बूस्ट..
Haryana Assembly Election Results 2024 : हरियाणा विधानसभेतील विजयानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये (Haryana Assembly Elections) मोठा उत्साह संचारला आहे. या राज्यात काँग्रेस विजयी होईल असा अंदाज सर्वच एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला होता. परंतु एक्झिट पोलचे सर्व अंदाज ध्वस्त करत भाजपने हरियाणा विजयाची हॅटट्रिक साधली. लोकसभा निवडणुकीतील कामगिरी (Lok Sabha Elections) नंतर हा विजय भाजपला अतिशय महत्वाचा होता. जर हरियाणात भाजप पराभूत झाला असता तर विरोधकांना आणखी एक नरेटिव्ह पसरवण्याची संधी मिळाली असती.
परंतु भाजपच्या विजयानंतर याचं विरोधकांना आणि त्यातही काँग्रेसला मोठा (Congress Party) धक्का बसला आहे. या यशातून स्पष्ट संदेश गेला आहे की विरोधक ज्या मुद्द्यांवर भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत होता त्यातील एकही मुद्दा हरियाणाच्या निवडणुकीत (Haryana Politics) चालला नाही. हरियाणाच नाही तर जम्मू काश्मीरमधील निकालही (Jammu Kashmir Elections) भाजपसाठी चांगलेच राहिले आहेत.
भाजपने जम्मूमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढली. जम्मूतील ४३ पैकी २९ मतदारसंघात भाजपला आघाडी मिळताना दिसत आहे. काश्मीर भागात भाजपला मोठं मिळेल याची तशीही शक्यता नव्हतीच. त्यामुळे भाजपने येथे फक्त १९ उमेदवार रिंगणात उतरवले होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रसने अग्निविर योजना, शेतकऱ्यांच्या समस्या, संविधान आणि आरक्षण या मुद्द्यांना घेत भाजपला घेरले होते.
Haryana Vidhansabha : कॉंग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षण विरोध.. PM मोदींचे जोरदार टीकास्त्र
निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला सुद्धा. मात्र विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) हा फायदा काँग्रेसला मिळाला नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी नेत्यांनी पुन्हा आरक्षणाचा मुद्दा पुढे केला होता. ज्यावेळी निकाल आले त्यात या मुद्याचा भाजपला नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसून आले होते.
भाजपने चमत्कार केला
काँग्रेसने निवडणूक प्रचारात सांगितले होते की शेतकरी नाराज आहेत. अग्नीवीर योजनेमुळे युवकही नाराज आहेत. परंतु भाजपने या निवडणुकीत सगळेच अंदाज फोल ठरवत मोठा उलटफेर केला. राज्यात सलग तिसऱ्यांदा सरकार बनवण्यात यश मिळवले. लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्यांतील निवडणुका अतिशय महत्वाच्या होत्या. यातही हरियाणा हिंदी पट्टीतील राज्य आहे त्यामुळे या राज्यातील निवडणूक निकालांचा परिणाम महाराष्ट्र, झारखंड, दिल्लीतील निवडणुकांमध्ये सुद्धा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नोव्हेंबर महिन्यात तर दिल्लीमध्ये (Delhi Elections) पुढील वर्षातील जानेवारी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होतील. असे असले तरी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आणि झारखंड बरोबरच (Jharkhand Elections 2024) दिल्लीच्याही निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे.
जर हरियाणात काँग्रेसने बाजी मारली असती तर काँग्रेसला आणखी एक नरेटिव्ह सेट करण्याची संधी मिळाली असती. परंतु निकाल काँग्रेसच्या विरुद्ध गेले आहेत त्यामुळे आता नरेटिव्ह सेट करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. काँग्रेसने शेतकरी आणि युवकांना विनाकारण भडकवण्याचा प्रयत्न केला असा प्रचार आता भाजपकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हरियाणासारखंच महाराष्ट्रात वनसाईड बहुमत मिळणार; नवनीत राणांना फुल कॉन्फिडन्स
हरियाणाने भाजपला दिला बूस्टर डोस
हरियाणा दिल्ली जवळील राज्य आहे. भाजप दिल्लीत कमकुवत आहे. हरियाणामध्ये यंदा परिस्थिती भाजपच्या विरोधात होती. तरीदेखील ज्या पद्धतीने विजय भाजपने मिळवला त्यामुळे काँग्रेस नेते सुद्धा हैराण झाले आहेत. आता या निकालांचा उपयोग महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीतील कार्यकर्त्यांत उत्साह भरण्यासाठी पक्ष करेल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची (Maharashtra Elections 2024) कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली होती. त्यातही भाजपला सर्वाधिक धक्का बसला होता. परंतु आता हरियाणातील विजय आणि जम्मू काश्मीरमधील निकालानंतर चार्ज होऊन भाजप महाराष्ट्रातील निवडणुकांना सामोरे जाईल.