Haryana Vidhansabha : कॉंग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षण विरोध…; PM मोदींचे जोरदार टीकास्त्र

  • Written By: Published:
Haryana Vidhansabha : कॉंग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षण विरोध…; PM मोदींचे जोरदार टीकास्त्र

PM Narendra Modi : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या (Haryana Vidhansabha Elections) निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या राज्यात प्रचार सभा घेत आहे. बुधवारी सोनीपतमध्ये झालेल्या प्रचार सभेत त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार घणाघात केला. काँग्रेसच्या (Congress) डीएनएमध्येच आरक्षण विरोध असल्याचं विधान त्यांनी केलं.

उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांचा बाजारबुणगे म्हणून उल्लेख, म्हणाले, ‘हिंमत असेल तर…’ 

सोनीपत येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने 60 वर्षे देशावर राज्य केलं, पण देशाच्या मुलींची त्यांना कधीच चिंता वाटली नाही. मी आल्यावर बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहीम सुरू केली, ज्याचा फायदा हरियाणाला झाला. पूर्वी प्रत्येक 1000 मुलांमागे 866 मुली होत्या, परंतु आता दर 1000 मुलांमागे 914 मुली आहेत. महिला शक्ती अधिक सक्षम करण्यासाठी हरियाणा भाजप चांगले काम करत आहे, असं मोदी म्हणाले.

Nora Fatehi: चिघळलेली दुखापत, पायाला सूज.. तरीही अभिनेत्री करणार परफॉर्म 

मोदी म्हणाले, आता जगभरातील कंपन्या भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळं तुम्हीच विचार करा, हरियाणात कसं सरकार असावं? हरियाणात उद्योगांना चालना देणारं भाजप सरकार गरजेचं आहेत. तुम्हालाही माहीती आहे, जिथे कुठं कॉंग्रेसचे सरकार आलं, जिथे त्यांना संधी मिळाली, जिथे जिथे काँग्रेसने पाऊल ठेवलं, तिथं एक गोष्ट नक्की झाली, भ्रष्टाचार आणि घराणेशाही, अशी टीका मोदींनी केली.

कॉंग्रेस हायकमांडच भ्रष्टाचारी
भारताच्या सरकारी व्यवस्थेत भ्रष्टाचाराला जन्म देणारी, भ्रष्टाचाराचं पालन-पोषण करणारी, आपल्या देशात भ्रष्टाचाराची कुणी जन्मदात्री असेल तर ती कॉंग्रेस पार्टी आहे. काँग्रेसचा शाही परिवार देशाचा सर्वात भ्रष्ट परिवार आहे. जिथे हायकमांडच भ्रष्टाचारी असतं, तिथे खालच्या लोकांन लुटीचा परवाना मिळतोच, असंही मोदी म्हणाले.

हरियाणा दलाल अन् जावयांच्या हाती सोपवला…
मोदी म्हणाले की, आठवणून बघा, 10 वर्षांपूर्वी जेव्हा इथे कॉंग्रेस सरकार होतं, तेव्हा काय व्हायचं? आज जे 18-20 वर्षाचे नवे मतदार आहेत, त्यांना तर माहितीही नसेल की, 10 वर्षांपूर्वी हरियाणातील शेतकऱ्यांना कसं लुटलं गेलं. तेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात लुटल्या गेल्या. काँग्रेसने हरियाणाला दलाल आणि जावयांच्या हाती सोपवून दिलं होतं, अशी खोचक टीका मोदींनी केली.

सरकारी कंत्राटांमध्येही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला होता. हरियाणाला लुटून खाणाऱ्या भ्रष्ट काँग्रेसला सरकारपासून लांबच ठेवायचं आहे. तरच हरियाणा वाचेल, असं मोदी म्हणाले.

आरक्षणविरोध काँग्रेसच्या डीएनएमध्ये
काँग्रेसच्या शाही परिवारातून जो कोणी पंतप्रधान झाला, त्यानं आरक्षणाला विरोध केला. आरक्षणाला विरोध हा काँग्रेसच्या डीएनएमध्येच आहे. त्यामुळेच आजही काँग्रेसच्या शाही कुटुंबातील चौथी पिढीही आरक्षण हटवण्याची चर्चा करते, अशी टीकाही मोदींनी केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube