Ajit Pawar On Maharashtra Cabinet : राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भ मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार फटकेबाजी करत आज शपथ घेणारे मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल असं विधान केले आहे.
या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) राज्यात महायुतीचं पुन्हा एकदा सरकार स्थापन झालं आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 17 जागा मिळाले होते मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 237 आमदार निवडणून आले असं देखील अजित पवार म्हणाले. तर आज होणाऱ्या मंत्रिमंडळाबाबात देखील अजित पवार यांनी मोठं विधान केले आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आज शपथ घेणारे मंत्री यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल असं अजित पवार या मेळाव्यात म्हणाले. प्रत्येक आमदारांना वाटतो त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी मात्र जागा मर्यादित असतात. मागच्या वेळी जेव्हा आपण सरकारमध्ये गेलो तेव्हा आपल्याला अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला होता. मात्र आता पुढील पाच वर्षांसाठी आम्ही तिघांनी असं ठरवलं आहे की, अडीच- अडीच वर्षांसाठी आमदारांना संधी द्याची. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधी मिळेल. असं देखील अजित पवार म्हणाले.
तसेच स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. सर्वोच्च न्यायालय कधीही स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीबाबत निर्णय देऊ शकते. असं देखील अजित पवार म्हणाले. माहितीनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9-10 मंत्रीपदे मिळणार आहे. नागपुरातील देशपांडे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भ मेळावा पार पडला.
शिंदेंची मोठी खेळी! तीन दिग्गज माजी मंत्र्यांचा पत्ता कट; सहा नव्या चेहऱ्यांची एन्ट्री
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळेच छगन भुजबळ या मेळाव्यात उपस्थित नव्हते अशी देखील माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, दत्तामामा भरणे, बाबासाहेब पाटील आणि मकरंद पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.