Download App

१० लोकसभा जागांवर अजित पवार गटाचा दावा कायम; जागावाटपावरून भुजबळ आक्रमक

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections) महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यामध्ये बैठकांचं सत्र सुरूच आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली होती. त्या बैठकीत शिंदे गटाला दोन अंकी तर अजित पवार (Ajit Pawar) गटाला एक अंकी जागा मिळणार असं ठरलं असल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान, आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावर भाष्य केले आहे.

‘वन नेशन वन इलेक्शन’ म्हणजे नेमकं काय? कोविंद समितीकडून अहवाल साद

सध्या भाजप अजित पवार गटाला चार जागा देण्यावर ठाम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप राष्ट्रवादीला चारपेक्षा जास्त जागा सोडण्यास नकार देत आहे. बारामती आणि रायगडच्या जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला तीन ते चार जागा मिळतील, हा दावा छगन भुजबळ यांनी फेटाळून लावला आहे. अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा अपघात, डोक्याला मोठी दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू 

आज माध्यमांशी भुजबळ यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अजित पवार गटाला चार जागा मिळणार अशी चर्चा सुरू आहे, असं विचारतचा भुजबळ म्हणाले की, चार जागा मिळणार आहेत, असं आम्ही ऐकलं नाही. अजित पवार गटाला चार जागा मिळतील, अशी कुठलीही चर्चा झालेली नाही आहे. आम्ही दहा जागा मागितल्या आहेत. तुम्ही पत्रकार लोक चार जागा मिळणार आहेत, हे पसरवत आहात… आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंनीही दहा जागांवर ठाम असल्याचं सांगितलं.

शिवसेनेच्या शिंदे गटही 16 हून अधिक जागांवर आग्रही आहे. त्यामुळं काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी अजित पवार गटालाही शिंदे गटा एवढ्याच जागा हव्यात, अशी मागणी केली होती. तर आता पुन्हा एकदा भुजबळ यांनी अजित पवार गट दहा जागांवर ठाम असल्याचं सांगितलं. त्यामुळं अजित पवार गटाला नेमक्या किती जागा मिळतील, हेच पाहणं महत्वाचं आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील, असा दावा शिंदे गटाने केला होता. आता या जागेवर भुजबळांनीही आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंगावरून नवे राजकारण छेडले जाण्याची शक्यता आहे.

follow us