Download App

Ambadas Danve : 21 जून हा ‘गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी युनोला पत्र लिहा; दानवेंचं कोश्यारींना खोचक पत्र

Ambadas Danve on Bhagat sing Koshari : आज राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. कोश्यारींचा कार्यकाळ आणि महाराष्ट्रातील राजकारण हे विशेष गाजलं. कारण त्यांच्याच काळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील अद्भूत सत्तास्थापना आणि युती आघाडी घडल्या आणि बिघडल्या. त्यात विशेष गाजलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये केलेलं बंड आणि पक्ष, चिन्ह ताब्यात घेतलं. त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नेहमीच विरोधी पक्षाने निशाणा साधला आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला. परत आपल्या राज्यात गेले तरी देखील ते अजही टीकेचे धनी होत आहेत. आता त्यांच्या वाढदिवशीच त्यांना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याच्या विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी एक खोचक पत्र लिहिले आहे. (Ambadas Danve wrote Letter to Bhagat sing Koshari for write letter to UNO for 21 June should ‘Gaddar din’ )

धनंजय मुंडेंच्या पाठिंब्याने पंकजा मुंडेंची नवी राजकीय इनिंग : 6 महिन्यात दुसरी निवडणूक एकत्र

काय आहे दानवेंचं हे पत्र ?

राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये दानवे म्हणाले, त्यांनी या पत्राच्या विषयामध्ये लिहिले आहे की, 21 जून हा ‘गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी युनोला पत्र लिहिण्याबाबत. तर पुढे दानवे म्हणाले की, आज आपला जन्मदिन असल्याचे कळाले. सर्वांत आधी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

व्यक्तिगत टीकेपेक्षा राजकीय मतभेद…; नीलम गोऱ्हेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल

आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेकदा भेटी झाल्या. महाराष्ट्रात असतना तुम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारला ज्या पद्धतीने अविरथ त्रास देण्याचे काम सुरू ठेवले. ते कमी की काय म्हणून राज्यात आपल्या दिल्लीच्या पातशहाच्या मार्गदर्शनाखाली सुर्याजी पिसाळ- खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचे पीक फोफावण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे 20 जून 2022 ला शिवसेनेतून 40 आमदारांनी गद्दारी करून बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचे पाप केले.

असं म्हणतात ही गद्दारी जाणून घेण्यासाठी जगातील 32-33 देशांनी माहिती घेतली. त्यामुळे या गद्दारीची दखल जगातील एवढे देश घात असतील तर हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा. त्यासाठी तुम्ही तुमच्या दिल्लीतील पातशहा मार्फत युनेकडे प्रयत्न करावे. आपणास शुभेच्छा. असं पत्र दानवे यांनी कोश्यारींना लिहिले आहे.

ट्विटमध्ये काय म्हणाले अंबादास दानवे ?

जर गतवर्षी झालेल्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली होती, तर २१ जून रोजी जगभरात ‘गद्दार दिवस’ साजरा करण्यात यावा. या कांडात आपली भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. आपल्यामुळे नावारूपाला आलेल्या या दिवसाला साजरा करण्यासाठी आपण आपले दिल्लीचे पातशाह यांच्या मार्फत संयुक्त राष्ट्राकडे पाठपुरावा, मागणी करावी. हे माझे आपणास आवाहन आहे. असं म्हणत दानवेंनी कोश्यारींना टॅग केले आहे.

Tags

follow us