व्यक्तिगत टीकेपेक्षा राजकीय मतभेद…; नीलम गोऱ्हेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल
Neelam Gorhe On Ramdas Kadam : शिवसेनेनं आजपर्यंत अनेक सुख-दुःख पाहिले आहेत. अनेक चढ-उतार शिवसेनेमध्ये आलेले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेकांनी नवीन पक्ष काढले, अनेकजण दुसऱ्या पक्षात गेले. मात्र शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच घडला असल्याचे विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, कोणी कोणावर व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा राजकीय मतभेद मांडावे, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचवेळी आमदार मनिषा कायंदे यांनी केलेल्या पक्षांतरावर बोलण्याचे मात्र टाळले. (neelam-gorhe-on-ramdas-kadam-shivsena-personal-political-differences)
Rahul Gandhi Birthday : 2024 ला राहुल गांधी पंतप्रधान होणार? 53 व्या वाढदिवशी अंकशास्त्र काय सांगतं?
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राजकीय मतभेद अनेक पक्षांमध्ये होत असतात. कॉंग्रेसच्या देखील दोन कॉंग्रेस झाल्या. आत्ता जे घडलं त्याचं उत्तर भविष्य देईल, जनता ठरवेल की, कोण योग्य वळणावर आहे, असं म्हणून एक प्रकारे शिवसेना शिंदे गटाला एकप्रकारे इशाराच दिला आहे.
त्याचवेळी मनीषा कायंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे, त्यावरुन नीलम गोऱ्हेंना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी कायंदेंच्या पक्षांतरावर काहीही बोलणं टाळलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मला यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही. कायंदेंवर काही कारवाई केली जाणार का? असा सवालही यावेळी गोऱ्हेंना करण्यात आला, त्यावर त्यांनी सांगितले की, या संदर्भात पक्षाचे जे गटनेते असतात ते निर्णय घेत असतात, मी यावर काही भाष्य करु शकत नाही, कारण माझं घटनात्मक पद आहे.
पीठाची अधिकारी म्हणून आमची भूमिका ही न्यायपालिकेसारखी असते. त्यामुळे माझ्या काही मर्यादा आहेत, परत परत सांगूनही तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मला तसेच प्रश्न विचारतात, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
हे न्यायिक चौकटीचे प्रकरण आहे. त्यामुळे यावर मला काही बोलण्याची इच्छा नाही, असंही गोऱ्हे म्हणाल्या. राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण होत आलं आहे, आजही शिंदे गटाकडून असं सांगण्यात येत आहे की, आमदारांना वेळ न दिल्यामुळेच हे मोठं बंड घडलं आहे, त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, त्याचे जे राजकीय मतभेद झाले आहेत, शिवसेना ठाकरे गट हा महाविकास आघाडीबरोबर आहे आणि शिवसेना शिंदे गट भाजपबरोबर आहे.
हेच राजकीय मतभेदाचं खरं मूळ आहे ना, त्यामुळे बाकीच्या व्यक्ती जोपर्यंत त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही, शेवटी कोणी कोणाला शंभर टक्के वेळ देऊ शकत नसतो, त्याच्यामुळे अशा गोष्टींपेक्षाही राजकीय मतभेद काय आहेत, त्याच्यावरती जर सर्वजण बोलले तर ते जास्त योग्य राहिल असं मला वाटतं, असंही यावेळी विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
जसं काल उद्धव ठाकरे यांनी राजकीय मतभेद मांडलेले आहेत, त्यामुळे वयक्तिक टिकेपेक्षा आपल्याला वैचारीकदृष्ट्या कोणत्या मार्गाने जायचे आहे, याच्यानुसार आपल्याला पुढचं राजकारण करायचं असतं, त्यामुळे मी म्हणेल की,वयक्तिक टीका जी आहे ती सोयीसोयीने बऱ्याचदा लोकं वापरतात, असा जोरदार हल्लाबोल नीलम गोऱ्हेंनी केला आहे.