Amit Shah On Uddhav Thackeray : स्वत:ला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार म्हणवून घेणारे आता औरंगजेब (Aurangzeb) फॅन क्लबचे नेते झाले आहेत, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला. ते भारतीय जनता पार्टीच्या (BJP) बालेवाडीतील अधिवेशनात बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी शरद पवारांवरही (Sharad Pawar) टीकास्त्र डागलं.
बाळासाहेबांचा वारसा सांगणारे औरंगजेब फॅन क्लबचे नेते…; अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन आज पुण्यातील बालेवाडीत झालं. या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह प्रदेश भाजपमधील अनेक दिग्गज मंत्री, आमदार, खासदार, नेते, आजी, माजी आमदार, खासदार उपस्थित होते. या अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात बोलताना अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
मुंडे, तावडे फ्रंट सीटवर; राज्याच्या राजकारण दोघांचेही जबरदस्त कमबॅक
शाह म्हणाले की, नरेंद्र मोदींनी आंतकवादाला मुळापासून उपटून टाकण्यासाठी अनेक निर्णय घेतले. देशाच्या औरंगजेब फॅन देऊ सुरक्षा देऊ शकत नाही. औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? तर इंडिया आघाडीवाले आहेत. त्यांचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. स्वत:ला बाळासाहेबांचे वारसदार म्हणणारे कसाबला बिर्यणी खाऊ घालणाऱ्यांसोबत आहेत. त्यांना लाज वाटलाय पाहिजे, अशी टीका शाह यांनी केली.
औरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्र आणि देशाला सुरुक्षित करू शकत नाही. देशाला आणि महाराष्ट्राला केवळ भाजप सुरक्षा देऊ शकते, असंही शाह म्हणाले.
काँग्रेसवाले अनेक अपप्रचार करत आहेत. पण त्यांनी 60 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी काय केले? हे काहीही करू शकत नाही, असं म्हणत शाह यांनी कॉंग्रेसवरही टीका केली.
शरद पवार सर्वात भ्रष्टाचारी
शरद पवार हे भारताच्या राजकारणात सर्वात भ्रष्टाचारी आहेत. शरद पवार यांनी राज्यात भ्रष्टाचाराच्या संस्था निर्माण केल्या आहेत. आम्ही 2014 मध्ये मराठ्यांना आरक्षण दिले. त्यांचे सरकार आले आणि आरक्षण गेले. आता पुन्हा आमची सत्ता आली आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार आले पाहिजे. ते सत्तेवर आले तर आरक्षण गायब होईल, अशी टीका शाह यांनी केली.