शरद पवारांच्या भेटीवरून भुजबळांना बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, कितीही टीका केली तरी…
Chhagan Bhujbal on Sharad Pawar Met : गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून आरक्षण मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता हळूहळू या सगळ्यामुळे गावागावात दुफळी निर्माण होत आहे. एकमेकांच्या विरोधात संघर्ष निर्माण होत आहे. (Chhagan Bhujbal) हा सर्व संघर्ष पोलिसांकडून हे थांबवणं अवघड आहे. तसंच, प्रश्न संपतील मात्र दुष्मनी कायम राहील त्यामुळे दुष्मनी संपवण्यासाठी माझा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. (Sharad Pawar) ते माध्यमांशी बोलत होते.
सर्वांना एकत्र येण्याची गरज Laxman Hake : … म्हणून शरद पवार भुजबळांची भेट, लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते आले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न सुटणार कसा? असा प्रश्नही उपस्थित भुजबळांनी उपस्थित केला आहे. हा राजकीय प्रश्न नाहीतर सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे सगळेजण एकत्र आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असंही भुजबळ म्हणाले आहेत. दरम्यान, बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता. पाऊस थांबल्यामुळे मला बोलण्यासाठी सांगितलं त्यावेळी मी या विषयावर बोललो असंही भुजबळ यावेळी म्हणाले.
ओबीसी आरक्षणाची आठवण
शरद पवार घरी आहेत का घरी याची माहिती घेतली आणि मी भेटीसाठी गेलो होतो. मी गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर तिथे होते. दरम्यान, नुकतेच मी गेलो तेव्हा शरद पवार झोपले होते. त्यांची तब्येत बरी नसल्याने ते त्यांच्या झोपण्याच्या खोलीतूनच त्यांनी माझ्याशी संवाद साधला यावेळी मी शरद पवारांना त्यांनी ओबीसींना दिलेल्या आरक्षणाची आठवण करून दिली अशी माहितीही भुजबळांनी यावेळी दिली आहे.
ज्येष्ठ सदस्य आहेत पुजा खेडकर प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री : सगळ्या कुटुंबाच्या संपत्तीची होणार पडताळणी
कुणाच्या टीकेपेक्षा हा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. शरद पवार यांचं मन खूप मोठ आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कितीही टीका केल्या तरी ते भेटल्यावर मनसोक्त गप्पा मारायचे असंही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवारांवरून प्रश्न विचारला असता, राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा कुटुंब म्हणून जावं लागत. पवार साहेब कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आहेत त्यामुळे त्यांना भेटायला गेलं ते चांगलंचं केलं असंही भुजबळ म्हणाले.