मुंडे, तावडे फ्रंट सीटवर; राज्याच्या राजकारण दोघांचेही जबरदस्त कमबॅक

  • Written By: Published:
मुंडे, तावडे फ्रंट सीटवर; राज्याच्या राजकारण दोघांचेही जबरदस्त कमबॅक

पुणे : गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय वर्तुळापासून लांब असलेल्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawade) यांचे आता जबरदस्त कमबॅक होताना दिसत आहे. पुण्यातील भाजपच्या (bjp) प्रदेश अधिवेशनात दोघांनाही फ्रंट सीटवर जागा देण्यात आली. मंत्री सुरेश खाडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना दुसऱ्या रांगेत बसवून मुंडे आणि तावडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी जागा देण्यात आली होती. (Pankaja Munde, Vinod Tawade in the front seat pune bjp meeting, comeback for both the state politicsPankaja Munde)


“डोकं धरून बसू नका, विधानसभेत कसर भरून काढा”; अमित शाहांचं कार्यकर्त्यांना टॉनिक

2019 च्या निवडणुकीत विनोद तावडे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. तर पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदासंघातून 32 हजार मतांनी पराभव झाला होता. या दोन्ही घटनांमागे देवेंद्र फडणवीस यांच्याच खेळ्या असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. स्पर्धक म्हणून फडणवीस यांनीच एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचे तिकीट कापले, तर मुंडे यांच्या वाढत्या महत्वकांक्षांना ब्रेक लावण्यासाठी धनंजय मुंडे यांना छुपी मदत केली, अशा राजकीय चर्चा सुरु होत्या.

नगरच्या जागेवर भाजपचा डोळा, आमदार जगताप म्हणाले, ‘यात गैर काय…’

त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस दोन्ही नेते विजनवासातच गेले होते. पण दोन वर्षांनंतर विनोद तावडे यांची केंद्राच्या राजकारणात बोलून घेण्यात आले. आधी राष्ट्रीय सचिव आणि नंतर राष्ट्रीय सरचिटणीस पदावर बढती देण्यात आली. तर पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नेमण्यात आले. तेव्हापासून विनोद तावडे त्यांच्या कामात चांगले रमले. त्यांच्याकडे बिहार, चंदीगडचे प्रभारीपद देण्यात आले.

पण पंकजा मुंडे मात्र नाखूशच असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांमूधन होत होती.

विधान परिषद असो की राज्यसभा असो, त्यांचे नाव डावलण्यात येत होते. त्याचवेळी पंकजा मुंडे यांना ज्युनियर असणाऱ्या प्रा. राम शिंदे, रमेश कराड यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात आली. विधानसभेपूर्वी पक्षात आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर यांनाही आमदार करण्यात आले. तर भागवत कराड यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रीय मंत्रीही बनविण्यात आले.

पंकजा मुंडे यांना मात्र संधी मिळत नव्हती. अखेरीस राज्यात पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. पण तिथेही त्यांचा सहा हजार मतांनी पराभव झाला. शेवटी त्यांचे तातडीने विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यात आले. आता मुंडे आणि तावडे हे दोघेही राजकारणातील मुख्य वर्तुळात दिसून येत आहेत. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत दोघांनाही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube