नेत्यांची जीव तोडून भाषण… अन् भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोदक, जिलेबीवर ताव…
पुणे : केंद्रीय मंत्री अश्विनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असे एकापेक्षा एक दिग्गज नेते सभागृहात भाषण करत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. पदाधिकारी मात्र हे सगळं सोडून सरळ जेवणावरच ताव मारत होते. पुण्यातील भाजपचा महाधिवेशनात (BJP Convention in Pune) हे चित्र होते.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दणका बसल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीवर (Maharashtra Election) लक्ष केंद्रित केले आहे ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पुण्यातील बालेवाडी स्टेडियम (Pune News) येथे महाराष्ट्र प्रदेश भजपचे अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते मार्गदर्शन करणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. तर रावसाहेब दानवे यांनी नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला.
तुतारीचा आवाज अन् काँग्रेसचा ढोल.. दानवेंचा भाजप कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी नवा रोडमॅप
या सगळ्या घडामोडी एका बाजूला सुरु असताना भाजपचे पदाधिकारी मात्र साडे बारा वाजल्यापासूनच जेवणावर तुटून पडले होते. पदाधिकाऱ्यांना जेवणामध्ये आम्रखंड, मटकीची उसळ पाटोड्याची भाजी, भाकरी, पुरी, बटाट्याची भाजी कोथिंबीरीची वडी, जिलेबी, उकडीचा मोदक असे अगदी पंचपकवान होते. या पकवानावर पदाधिकाऱ्यांनी अगदी मनसोक्तपणे ताव मारला. कोणी वाटीने आम्रखंड पित होते, तर कोणी ग्लासने सुद्धा पित होते. अनेकांनी एकावेळी सात सात ते आठ जिलेबी फस्त केली. त्यामुळे पदाधिकारी नेमके भाषणाला आले होते, मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते की जेवणावर ताव मारण्यासाठी हे पदाधिकाऱ्यांनाच ठाऊक.