Download App

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडी भ्रष्टाचारीच, अमित शाहांनी १० वर्षांचा हिशोबच दिला

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली.

Amit Shah On Rahul Gandhi : गेल्या २३ वर्षापासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करताना एक दिवसही नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सुट्टी घेतली नाही. मोदींवर 25 पैशांचाही भ्रष्टाचार केल्याचा आरोप कोणी करू शकत नाही. मात्र, दुसरीकडे देशामध्ये उष्णता वाढताच राहुल गांधी बँकॉक-थायलंडला जातात. त्यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीन (India Alliance) 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली.

‘बाळासाहेब थोरात भाजपात येणार होते, आले तर स्वागतच’; मंत्री विखेंचा खळबळजनक दावा 

जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचाचार्थ आज अमित शाह यांची जालन्यात सभा झाली. त्यावेळी बोलतांना शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, इंडिया आघाडीच्या एका मंत्र्याकडून 20 कोटींची रोकड जप्त केली. काँग्रेस खासदाराकडून साडेतीन कोटी रुपये जप्त करण्यात आले. ममताजींच्या मंत्र्याकडून 50 कोटी रुपये जप्त करण्यात आले. अशा प्रकारे गेल्या 10 वर्षात 12 लाख कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी करत असल्याची टीका शाह यांनी केली.

घड्याळ चोरणाऱ्यांचं घड्याळ 10 : 10 वाजता बंद पडणार’; कराळे गुरुजींच्या निशाण्यावर अजितदादा! 

पुढं बोलतांना शाह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला समृद्ध आणि संपन्न केलं. नरेंद्र मोदींनी देशाचे नाव जगभरात उंचावण्याचे काम केले आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे काम नरेंद्र मोदींनीचं केलं. मात्र, शरद पवार अँड कंपनीने राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षे प्रलंबित ठेवल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे.

इंडिया आघाडीवाले कलम ३७० सांभाळून बसले होते. मात्र, मोदींनी ते कलम हटवले. काँग्रेस पक्ष पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेत आहे. भविष्यात काँग्रेस सत्तेत आल्यास ते राम मंदिराला कुलूप लावतील, असा दावा शाह यांनी केला.

इंडिया आघाडीची सत्ता असताना महाराष्ट्राला फक्त 1 लाख 91 हजार कोटी रुपये दिले गेले. पण, मोदी सरकार आले आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर मोदीजींनी 10 वर्षात 9 लाख 80 हजार कोटी रुपये दिले. नरेंद्र मोदी हे राज्य आणि देशाला पुढे नेऊ शकतात. त्यामुळे आपण भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

follow us