Download App

वादग्रस्त विधाने खपवून घेणार नाही, अमित शाह यांच्याकडून चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानाची दखल

  • Written By: Last Updated:

मागील काही दिवसापासून मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावरून काल उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन थेट आव्हान दिले. पण आता हा वाद दिल्ली पर्यंत पोहचला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडतानाचं शिवसेनेचं योगदान नसल्याचा म्हटलं होत. ते म्हणाले होते की बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं बाबरी आंदोलनात योगदान नाही. शिवसेनेचा कोणीही नेता बाबरी पडताना तिथे नव्हता.

Narhari Zirwal : पांढरा सदरा, गांधी टोपी आणि हिरवं लुगडं; जपान दौऱ्यापूर्वीचा झिरवळांचा लूक चर्चेत

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चा सुरु झाला. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली. त्यांना ते पटत नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा, तो माझ्याकडे आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.

बाळासाहेबांचा एवढा अपमान आतापर्यंत कोणी केला नाही, तो या मुख्यमंत्र्यांना कसा सहन झाला? आता चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिल.

बच्चू कडूंच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री मैदानात, नाराजी दूर करण्यासाठी देणार ‘हे’ खास गिफ्ट

भाजप नेते दिल्लीत

काल आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आशिष शेलार दिल्लीत गेले होते. त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांची राज्यातील सध्याची राजकीय समीकरणं, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरही चर्चा झाली, असं सांगण्यात येत आहे.

याचं चर्चेदरम्यान अमित शाह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर चर्चा केली आणि त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. तर आगामी काळात देशात आणि राज्यात निवडणुका आहेत, त्यामुळे नेत्यांनी अशी वादग्रस्त विधान टाळावी असा आदेशच दिला आहे. याशिवाय सध्या केंद्र, राज्यातील सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारच्या विकासकामांवरच बोला. अशी सूचना त्यांनी केल्याची चर्चा आहे.

Tags

follow us