Download App

Amol Kolhe भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीपासून दूर गेल्याची ही ४ उदाहरणे

  • Written By: Last Updated:

राष्ट्रवादीचे  (NCP) शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण त्यांच्या सोशल मीडियातल्या पोस्ट देखील कायम चर्चेचा विषय असतात. काल त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली, ज्यावरून मोठ्या राजकीय चर्चेला उधाण आलं. या पोस्टमुळे अमोल कोल्हेंचा आता राष्ट्रवादीकडून भाजपाकडे तर प्रवास सुरु झाला नाहीय ना असा अंदाज वर्तवला जात आहे.

काय आहे कारण?

काल जागतिक पुस्तक दिन होता. तो जगभर साजरा केला गेला. या दिनानिमित्त अनेक सेलिब्रेटी लोकांनां पुस्तकांचं वाचन करण्याची प्रेरणा देत असतात. याच दिवसाचं निमित्त साधत अमोल कोल्हे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या दोन फोटोंचा एक कोलाज बनवलेला आहे. या फोटोमधील पहिल्या फोटोमध्ये अमोल कोल्हे शरद पवार यांचं ‘नेमकेच बोलणे’ हे पुस्तक अभ्यासात असताना दिसून येत आहेत.

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा, चर्चांना उधाण

तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘द न्यू बीजेपी’ हे पुस्तक वाचत आहेत. आता या दुसऱ्या फोटोवरुन चर्चा होणार नाही हे शक्यच नव्हतं. कारण अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार असताना पुस्तकाच्या माध्यमातून बीजेपीबाबत काही हिंट तर देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत ना असा संशय व्यक्त केला गेला.

या पोस्टमुळे चर्चा सुरु झाली असली तरी याआधीही अनेकदा ते अशा पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्याचा हा आढावा

आधी आभाळ बघायचं, वारं बघायचं मग नांगरायला घ्यायचं

काही महिन्यापूर्वी जेव्हा त्याच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी खासदार कोल्हे हे आगामी लोकसभा निवडणूक लढणार की, नाही? तसेच भाजपमधून लढणार की, राष्ट्रवादीतून लढणार? याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अमोल कोल्हे यांनी संदिग्ध उत्तर दिलं होत.

ते म्हणाले होते की, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आधी आभाळ बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं असतं. उद्याची निवडणूक लढवायची की, नाही? कोठून लढवायची? ते आत्ता कशाला सांगायचं, ते वारं पाहून ठरवायचं असंत, असं सूचक विधान कोल्हे यांनी केलं होत.

“…तर राहतील त्यांना सोबत घेऊन लढणार” पवारांच्या ‘त्या’ वाक्यांवर नाना पटोलेंकडून उत्तर

चिंचवड मध्ये फुंकली शिट्टी

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात ‘शिट्टी’ वाजवत एकप्रकारे राहुल कलाटेंचा (Rahul Kalate) प्रचार केल्याचे बोलले जात होते. कारण म्हणजे राहुल कलाटे ‘शिट्टी’ याच चिन्हावर निवडणूक लढवत होते.

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील मैत्री पुणे जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. नागपूरच्या एका कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी शिट्टी फुंकून अप्रत्यक्षपणे राहुल कलाटे यांचा प्रचार केल्याची चर्चा चिंचवड मतदारसंघात रंगली आहे. अमोल कोल्हे यांचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बैठकीला उपस्थिती

संसदेच्या बजेट पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. राज्यातले महत्वाचे प्रश्न संसदेत मांडले जावेत यासाठी दरवर्षी या बैठकीची प्रथा आहे. या बैठकीला महा आघाडीच्या खासदार यांनी गैरहजेरी लावली. पण राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावत, सध्या आपल्याला राष्ट्रवादी पेक्षा भाजप जवळ असल्याचे संकेत कोल्हे यांनी दिले आहेत.

“…तर राहतील त्यांना सोबत घेऊन लढणार” पवारांच्या ‘त्या’ वाक्यांवर नाना पटोलेंकडून उत्तर

महाराष्ट्र मधील प्रश्नासाठी ही बैठक बोलावली गेली. पण प्रश्न पेक्षा बैठक अमोल कोल्हे यांच्या उपस्थिती मुळे गाजली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे , काँग्रेस चे बाळू धानोरकर, सेनेचे विनायक राऊत, राजन विचारे, खासदार अरविंद सावंत यांच्या सह राज्यसभा सदस्य शरद पवार, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, अनिल देसाई, प्रियांका शर्मा या सर्व खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली होती

मोदींच कौतुक पण राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला दांडी

मागच्या काही महिन्यात अनेकदा अमोल कोल्हे पक्षाच्या बैठकीतून गायब दिसले आहेत. शिर्डी येथी शिबिराला देखील ते गैरहजर होते. त्यांच्याच मतदारसंघात रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते गैरहजर राहिले होते. शिवाय याच मुद्द्यारून रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्याच ट्विटरयावर वाद देखील झाला होता. त्यांच्या अनुपस्थितीवरून पक्षाकडून त्याच्या इतर कार्यक्रमाचं कारण सांगितलं जात.

पण दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होत. शिवाय काही महिण्यापुर्वी त्यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. अशा सगळ्या घटनांमधून अमोल कोल्हे भाजपच्या जवळ गेल्याच बोललं जात आहे. पण येत्या काळात ते नक्की काय निर्णय घेतात. हे पाहावं लागेल.

Tags

follow us