Amol Mitkari : राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी आता संपली. महायुतीने (Mahayuti) मॅजिक फिगरच्या पुढचा आकडा गाठल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं. बारामतीत अजित पवारांनीही (Ajit Pawar) लाखोंच्या मतांनी विजय मिळवला. अजितदादांच्या या मोठ्या यशानंतर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या नेत्याला डिवचलं.
फडणवीसांना CM म्हणून पाठिंबा आहे का?, भुजबळ म्हणाले, ‘आमचा विरोध…’
बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, अशा शब्दात अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं.
डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल चॅलेंज दिलं होतं ते आज त्यांनी पूर्ण करावं! बारामती दादांचीच हे सिद्ध झाले आहे. प्रमाणपत्र घेतल्यावर सरळ बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा आणि चॅलेंज पूर्ण करावे..@Awhadspeaks
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 23, 2024
अजित पवार बारामतीतून पराभूत झाले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल, असं ओपन चॅलेजं मिटकरींनी दिले होते. मात्र, अजित पवार निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी आठ वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला याचचे, असा प्रहार मिटकरींनी केला होता. यासोबतच अजित पवार एक लाखाच्या मताधिक्याने जिंकले किंवा दादा विजयी झाले तर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या घरी घरगडी म्हणून राहावे किंवा अजितदादा पराभूत झाले तर मी आव्हाडांच्या घरी घरगडी म्हणून कामाला जाईल, असं मिटकरींनी चॅलेंज दिलं होतं.
एक-एक धक्का बसतं, एकनाथ खडसेंचा राजकीय अस्त कसा झाला ?
दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांनी पुतणे युगेंद्र पवार यांचा चांगलाच पराभव केला. अजितदादांनी 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आपला गड राखला. त्यामुळे, आता मिटकरींनी ट्विट करुन पुन्हा आव्हाड यांना डिवचलं. मिटकरी यांनी त्यांच्या एक्स हँडल अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यांनी लिहिलं की, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल चॅलेंज दिलं होतं, ते आज त्यांनी पूर्ण करावं! बारामती दादांचीच हे आता सिद्ध झालं आहे. प्रमाणपत्र घेतल्यावर सरळ बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा आणि आपले चॅलेज पूर्ण करावे.
यासोबतच अजित पवार हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील, असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. आमच्या अपेक्षित जागा निवडून आल्या आहेत, स्ट्राईक रेटवर मुख्यमंत्रिपद घेऊ, असेही मिटकरी म्हणाले.