एक-एक धक्का बसतं, एकनाथ खडसेंचा राजकीय अस्त कसा झाला ?

  • Written By: Published:
एक-एक धक्का बसतं, एकनाथ खडसेंचा राजकीय अस्त कसा झाला ?

Eknath Khadse : एकेकाळी भाजप (BJP) म्हटलं की प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे अशा तीन नेत्यांची नावे डोळ्यासमोर येतं. राज्यात काँग्रेसची बलाढ्य ताकद होती. त्या काळात तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजविली. शहरापासून खेड्यापर्यंत पक्षविस्तार केला. त्यातील प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे आज आपल्यात नाहीत. या दोन्ही नेत्यांचा पक्षात, मोठ्यापदावर असताना निधन झाले. पण यातील तिसरा मोठा नेता एकनाथ खडसे (Eknath Khadse) हा आज भाजपमध्ये नाही. हा नेता उतरवयात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीला साथ देतोय. ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आहे. एकेकाळी राज्यात वजन असलेल्या या ओबीसी नेत्याला आपल्या जिल्ह्यात ताकद दाखविता आली का ? होमग्राउंडवर ते मुलीला सेट करू शकले का ? हेच आपण पाहुया…

नाथाभाऊ, ‘हा’ देवेंद्र फडणवीसचा शब्द, राज्यपालपदावरून एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट


2014 ला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पण पत्ता कट

2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत राज्यात भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले. भाजप 123 हून अधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मुख्यमंत्रीपदासाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रस्सीखेच होती. पण केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत सीएमच्या खुर्चीवर बसविले. तर खडसे यांचारही मान राखत त्यांच्याकडे अनेक खात्याची जबाबदारी दिली. त्यांच्याकडे तब्बल बारा खाते होते. त्यात महसूलमंत्री, कृषिमंत्री, राज्य उत्पादन शुल्क असे महत्त्वाचे खाते होते. 2014 ते 2016 या कालावधीत ते मंत्री होते.


भष्ट्राचाऱ्याच्या आरोपाने घेरले

2016 मध्ये खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाले. खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरीतील एमआयडीसीची 3.75 कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्याचा आरोप झाला. याप्रकरणी ईडीने चौकशी केली. त्यात चौधरी यांच्या नावावर जमीन खरेदी झाली. तर जमीन खरेदीसाठी पाच शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे.


तिकीट कापले पण मुलीली जिंकून आणू शकले नाहीत ?

तसे खडसे हे 2016 पासून राजकारणातून दूर फेकले गेले. 2019 मध्ये एकनाथ खडसे यांचे पक्षाने तिकीट कापले. पण त्यांची मुलगी रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी दिली. पण मुक्ताईनगर या बालेकिल्ल्यात रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत निंबा पाटील हे अपक्ष रिंगणात उतरले. अटीतटीच्या लढतीमध्ये रोहिणी खडसे या 1989 मतांनी पराभूत झाल्या. मंत्रिपद, तिकीट कापल्यानंतर रोहिणी खडसे यांच्या पराभवाने एकनाथ खडसे यांना तिसरी झटका बसला.


पक्ष सोडला पण जास्त फायदा नाही

एकनाथ खडसे हे काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध लढत राहिले. काँग्रेस नेते, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर ते कायम राजकीय आरोप करतं. सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असताना एकनाथ खडसे यांनी पक्षाला राम-राम केला. ज्या पक्षासाठी आयुष्य घातले, ते पक्ष सोडून ते शरद पवार यांच्याबरोबर गेले. त्यानंतर त्यांना विधानपरिषद मिळाली. तर मुलीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाचे प्रदेशाध्यक्ष मिळाले. पण शरद पवार यांच्या पक्षाला खडसे यांचा जास्त फायदा झाला नाही.


देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याविरोधात राळ, पण नुकसान खडसेंचे

भाजप सोडल्यानंतर एकेकाळी आपले सहकारी असलेले देवेंद्र फडणवीस, राजकारणात आणणाऱ्या गिरीश महाजन यांच्यावर उघडपणे एकनाथ खडसे हे आरोप करत होते. फडणवीस हे खडसेंवर थेट बोलण्यास टाळत होते. गिरीश महाजन हे खडसेंवर टीका, आरोप करण्यास कचरत नव्हते. ते थेटपणे खडसे यांच्यावर आरोप करत. गिरीश महाजन यांचे जळगाव जिल्ह्यात राजकीय वजन वाढत होते. त्याला फडणवीस यांची साथ मिळत होती. त्यावरून खडसे हे गिरीश महाजन यांच्यावर थेट खालच्या पातळीवर आरोप करत होते. जळगाव जिल्हा दूध संघही खडसे यांचा ताब्यात होता. परंतु त्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपने खडसे यांच्यावर झाला. त्यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसे यांचा झटका बसला. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पराभव केला. दूध संघातूनही खडसे यांची पिछेहाट झाली.

मुलीसोबत चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे…; एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट


विधानसभा निवडणुकीत मुलीचा दुसरा पराभव

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला होता. 1989 पासून ते 2019 पर्यंत ते मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार राहिलेले. तब्बल तीस वर्षे ते या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 2019 नंतर 2024 लाही ते मुलगी रोहिणी खडसे यांना निवडून आणू शकले नाहीत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत त्यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन केले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून रिंगणात असलेल्या रोहिणी खडसे यांचा शिवसेनेचे शिंदे गटाचे चंद्रकांत निंबा पाटील यांनी दुसऱ्यांदा पराभव केला. गेल्यावेळी अटीतटीची लढत झाली होती. यंदा मात्र मोठ्या फरकाने सुमारे चोवीस हजार मतांनी रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. ज्या मतदारसंघात सहकारी कारखाना, दूध उत्पादक, सहकारी संस्थेचे पान खडसे यांच्याशिवाय हालवत नव्हते. त्या मतदारसंघात खडसे यांना मुलीच्या रुपाने दोन पराभव स्वीकारावा लागला.


विरोधकांना खिंडीत गाठण्यातही अपयशी

जळगाव जिल्ह्यात महायुतीने सर्व अकरा जागा जिंकत आपले वर्चस्व दाखविले. तर खडसेंसारखे मोठा नेते बरोबर असताना महाविकास आघाडी या जिल्ह्यात खातेही उघडू शकले नाही. ज्या गिरीश महाजनांमुळे आपल्या राजकारणाला सुरुंग लावला. त्या महाजन यांना घेरण्यासाठी खडसे यांनी मोठी ताकद लावली होती. महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडदे यांना रिंगणात उतरविले होते. पण महाजन यांनी खोडदे यांचा 26 हजार 885 मतांनी पराभव केला. ज्या एकनाथ खडसे यांच्यात शब्दाला भाजपमध्ये मान होता. केंद्रीय नेत्यांशी थेट संपर्क होता. राज्यात भाजपचे आमदार निवडून आणण्याची ताकद होती. त्या खडसे यांना आपल्या बालेकिल्ल्यात मुलीला निवडून आणता आलेले नाही. आपल्या जिल्ह्यात महाविकास आघाडीला ताकद देता आलेली नाही, याचा अर्थ खडसे यांचा राजकीय प्रभाव संपला आहे. पण सुन रक्षा खडसे या केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्या भाजपकडून खडसे घरण्याचे राजकारण चालवत आहेत. सासऱ्यांचे राजकारण संपले असले तरी सून मात्र भाजपमध्ये राहून त्यांचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube