नादाला लागू नका, आपण भावकीमुळे आमदार; अजितदादांचा रोहित पवारांना टोला

Ajit Pawar On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार राज्य सरकारवर टीका करताना अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल करत आहे. तर आज इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळ्यासाठी रोहित पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. या कार्यक्रमात देखील दोघांमध्ये चांगलीच राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली.
या कार्यक्रमात बोलताना दादा गावकीचा विचार करतात. मात्र, भावकीला विसरले असा टोला रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लावला. तर याला प्रत्युत्तर देत भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झाला असं अजित पवार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमात सुरुवातीला बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, दादा गावकीचा विचार करतात, मात्र, भावकीला विसरले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मगाशी बोलत असताना रोहित म्हणाला की, दादांचे गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे लक्ष नाही. भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास. आपण बॅलेट पेपरवर निवडून आला आहे, जयंत पाटील जरा त्यांना सांगा असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लावला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मी महायुतीमध्ये गेल्यापासून तुमच्या कुणावर टीका केली आहे का? तुम्ही तुमच्या विचाराने चालत आहात. मी माझ्या विचाराने चालत आहात. मी माझ्या विचाराने चालतो. असं म्हणत त्यांनी माझ्या नादाला लागू नका असा इशारा देखील दिला.
तसेच शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही. मला रोहितनं सांगितलं की, जयंत पाटील आणि मी हेलिकॉप्टरने जाईल. त्यावेळी मला असं वाटलं माढं भाषण ऐकायला दोघेही नाहीत. मात्र माझं नशीब बघा की दोघे सुद्धा भाषण ऐकायला आहेत.
“वाळवा तालुका वाकत नाही फंदफितुरी झाली तरी”, अजितदादांसमोरच जयंत पाटलांची मार्मिक टोलेबाजी
जयंत पाटील यांचा आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं व्यक्तीमत्व असा येथे उल्लेख करण्यात आला. जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणं नाही का? कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्यानं करायची असेही यावेळी अजित पवार म्हणाले.