Download App

महायुतीतील वाद उफाळला: शिवतारेंना आवरा, अजितदादांच्या शिलेदाराचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

  • Written By: Last Updated:

Amol Mitkari on Vijay Shivtare: लोकसभा निवडणूक (Loksabha Election) तोंडावर आली आहे. त्यात महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप झालेले नाहीत. त्यात युतीतील नेते हे एकमेंकावर तुटून पडत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष होणार आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु शिवसेनेचे नेते व माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांचे मनसुबे उधळून लावण्याचे ठरविले आहे. थेट जुने हिशोब चुकते करण्याची भाषाच शिवतारे यांनी सुरू केलीय. त्याला आता अजित पवारांचे शिलेदार आमदार अमोल मिटकरी यांनी थेट उत्तर दिले आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. एकनाथ शिंदेसाहेब शिवतारेंना आवरा. त्यांनी बोलण्यात हलकटपणाचा कळस केलाय. महायुतीसोबत राहून जर दादांविरुद्ध बोलण्याचा उन्मत्तपणा करित असतील तर आमचाही नाईलाज होईल, असा इशाराच मिटकरी यांनी दिलाय. यावर अद्याप तरी शिवसेनेच्या नेत्यांचे उत्तर आलेले नाही.

Ranji Trophy: विदर्भाने नांग्या टाकल्या ! अजिंक्य रहाणे मुंबईसाठी संकटमोचक


काय म्हणाले शिवतारे ?

बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसून, आता गुलामगिरी नव्हे तर, बदला घ्यायची वेळ आली आहे, असा एका जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांनी खुले आव्हान देत शिवतारे यांना पराभवाचा धक्का दिला होता. महायुती झाली असली तरी त्याची खंत शिवतारे यांच्या मनात आहे. यावरून ते सुनेत्रा पवार यांचे काम करणार नाहीत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा धक्काच आहे.

अजित पवार
गटाचे 12 बडे नेते लवकरच भाजपात जाणार; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा


अजितदादांचे काय आव्हान होते ?

तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर, मी कुणाच्या बापाला ऐकत नाही.” असे थेट आव्हान शिवतारेंना दिले होते. हे आव्हान अजितदादांनी खरे करून दाखविले होते. शिवतारे हे तब्बल पंचवीस हजार मते पुरंदर मतदारसंघात पराभूत झाले होते.

follow us